महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘एक्स’ अकाउंट रविवारी हॅक झाले. हॅकर्सनी पाकिस्तान आणि तुर्कीचे ध्वज पोस्ट केले आणि दोन्ही इस्लामिक देशांचे फोटो लाईव्ह-स्ट्रीम केले, ज्यामुळे खळबळ उडाली.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 'एक्स' हँडल रविवारी हॅक झाल्याचे आढळून आले, ज्यामध्ये हॅकर्सनी पाकिस्तान आणि तुर्कीच्या ध्वजांचे फोटो पोस्ट केले होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. भारत आणि पाकिस्तान आशिया कपमध्ये आपला दुसरा सामना खेळणार असताना हॅकर्सनी दोन्ही इस्लामिक देशांच्या छायाचित्रांसह प्रतिमा लाईव्ह-स्ट्रीम केल्या होत्या, त्यामुळं एकच खळबळ उडाली होती.

अधिकारी काय म्हणाले?

"आम्ही ताबडतोब सायबर क्राइम पोलिसांना सतर्क केले. उपमुख्यमंत्री यांच्या एक्स हँडलचे प्रभारी असलेल्या आमच्या टीमने नंतर अकाउंट परत मिळवले," असे अधिकाऱ्याने सांगितले. अकाउंट व्यवस्थित करण्यासाठी ३० ते ४५ मिनिटे लागली, असे अधिकाऱ्याने सांगितले. आता सध्या एकनाथ शिंदे यांचे अकाउंट पूर्ववत झाल्याचं दिसून आलं आहे.