मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात गाडीला आग लागल्याची घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत.

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवर आज (15 जुलै) मोठी दुर्घटना घडली. कोस्टल रोडच्या बोगद्यात एका धावत्या कारला अचानक आग लागली गेली. यामुळे खळबळ उडाली. या घटनेमुळे बोगद्यातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सध्या तेथे शेकडो वाहने अडकून पडल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

YouTube video player

कोस्टल रोड बोगद्यात नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोस्टल रोडच्या बोगद्यातून जात असलेल्या एका कारने अचानक पेट घेतला. वाहनातून धूर निघू लागला. यामुळे वाहन चालकाने तत्काळ गाडी थांबवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी रवाना झाल्या.

शेकडो वाहनं बोगद्यात अडकली

आग लागलेल्या कारमुळे सुरक्षेच्या कारणास्तव बोगद्यातील वाहतूक तातडीने थांबवण्यात आली. त्यामुळे मागून येणारी शेकडो वाहनं बोगद्यातच अडकली. अनेक वाहनचालक आणि प्रवासी गाड्यांमधून खाली उतरून परिस्थितीची माहिती घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

नरीमन पॉईंटकडील वाहतूक रोखली

दुर्घटनेनंतर नरीमन पॉईंटवरून कोस्टल रोडच्या दिशेने जाणारी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बोगद्यामध्ये अडकलेल्या वाहनांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बचावकार्य सुरू

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरूआहे. धुरामुळे बोगद्यात कमी सदृश्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. सध्या वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.