- Home
- Mumbai
- BMCचा दिवाळी धमाका! कर्मचाऱ्यांना ₹31,000 बोनस; जाणून घ्या कोणत्या कर्मचाऱ्यांची दिवाळी उजळली?
BMCचा दिवाळी धमाका! कर्मचाऱ्यांना ₹31,000 बोनस; जाणून घ्या कोणत्या कर्मचाऱ्यांची दिवाळी उजळली?
BMC Announced Diwali Bonus: बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) २०२५ च्या दिवाळीसाठी कर्मचाऱ्यांना ३१,००० रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले. BMC आयुक्त गगराणी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षक, आरोग्य सेविका, कर्मचाऱ्यांचा सण आनंदात साजरा होणारय.

BMCचा दिवाळी धमाका!
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी २०२५ एक खास पर्व ठरणार आहे. कारण, यंदा सर्व पात्र कर्मचाऱ्यांना रु. ३१,००० सानुग्रह अनुदान (दिवाळी बोनस) जाहीर करण्यात आले आहे. हा निर्णय BMC आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी घेतला आहे.
दिवाळी गोड, बोनस ठसठशीत!
बीएमसीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आनंद देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य सेविका, आणि इतर अनेक कर्मचाऱ्यांचा सण आणखी आनंददायी होणार आहे.
कोणाला किती मिळणार?
श्रेणी बोनस / भेटराशी
BMC अधिकारी व कर्मचारी ₹31,000
अनुदानित खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी ₹31,000
महानगरपालिका व खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक ₹31,000
माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित) ₹31,000
माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित) ₹31,000
अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याते व शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित) ₹31,000
अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित) ₹31,000
सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV) भाऊबीज भेट ₹14,000
बालवाडीतील शिक्षिका व मदतनीस भाऊबीज भेट ₹5,000
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींकडून शुभेच्छा
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी BMC अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
बोनस कर्मचाऱ्यांच्या घराघरात आनंद घेऊन येणार
बीएमसीचा हा निर्णय केवळ आर्थिक लाभ नाही, तर त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निष्ठेची आणि मेहनतीची पावती आहे. सणासुदीच्या काळात मिळणारा हा बोनस कर्मचाऱ्यांच्या घराघरात आनंद व उत्सव घेऊन येणार आहे.

