अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी ४,००० ते ५,००० कोटी रुपयांचा खर्च, मुंबईत लग्नकार्य पार पडणार

| Published : Jul 12 2024, 12:29 PM IST

anant radhika
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी ४,००० ते ५,००० कोटी रुपयांचा खर्च, मुंबईत लग्नकार्य पार पडणार
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

बॉलिवूडमधील सेलिब्रेटी यावेळी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहतील असे सांगण्यात आले आहे. यामध्ये खासकरून सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण आणि आलीय भट या आघाडीच्या कलाकारांचा प्रामुख्याने समावेश होतो.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे दोघेही आज विवाहबद्ध होणार आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले असून जगातील आघाडीचे सर्व दिग्गज कलाकार या लग्नाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. किम कार्देशीयन ही यावेळी उपस्थित राहणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे दोघांच्या विवाह सोहळ्याला भारतातूनही आघाडीचे कलाकार उपस्थित राहतील. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा जामनगर आणि युरोप येथे आधीचे कार्यक्रम पडलेत पार - 
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या दोघांच्या विवाहाचे कार्यक्रम जामनगर आणि युरोप येथील इटली या देशात पार पडले आहेत. यावेळी येथेही मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. यावेळी देश विदेशातील पंतप्रधान आणि राष्ट्रपती हेही या कार्यक्रमांना हजेरी लावतील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील हॉटेलचे भाव मोठ्या प्रमाणावर गगनाला भिडले आहेत. 

बॉलिवूडचे सेलिब्रेटी राहणार हजर - 
बॉलिवूडमधील सेलिब्रेटी यावेळी या लग्न सोहळ्याला उपस्थित राहतील असे सांगण्यात आले आहे. यामध्ये खासकरून सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण आणि आलीय भट या आघाडीच्या कलाकारांचा प्रामुख्याने समावेश होतो. प्रियांका चोप्राने इंस्टाग्रामला टाकलेल्या स्टोरीमुळे ती या कार्यक्रमाला हजर राहील असे दिसून आले आहे. भारतीय कुटुंबांमध्ये लग्नात मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याचा रीतिरिवाज असून या लग्नातही मोठ्या प्रमाणावर खर्च केला जाणार आहे. यावेळी जवळपास ४००० ते ५००० कोटी रुपये खर्च येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
आणखी वाचा - 
बच्चू कडू हे विधानपरिषदेत कोणाला करणार मतदान? प्रहार पक्षाचे मतदान 'याच' उमेदवारांना मिळणार
प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या अपंगत्वाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती केली स्थापन, त्यांच्या आईने पोलिसांना घरात येण्यापासून रोखले