कोकण मंडळाच्या ५ हजार २८५ घरे आणि ७७ भूखंड विकत घेण्यासाठी लॉटरी घेण्यात आली आहे. ठाणे, नवी मुंबईसह इतर ठिकाणी असलेल्या या घरांसाठी आतापर्यंत ६७ हजार ५३९ अर्ज आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट आहे.

ठाणे: म्हाडामध्ये सवलतीमध्ये घर भेटत असल्यामुळे लोक खरेदी करण्यासाठी गर्दी करत असतात. कोकण मंडळाच्या ५ हजार २८५ घरे आणि ७७ भूखंड विकत घेण्यासाठी लॉटरी घेण्यात आली. त्या लॉटरीला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत ६७ हजार ५३९ अर्ज फिरले आहेत. त्यापैकी ४० हजार ९९८ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे.

चौकशीतून समोर आली माहिती 

कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये ठाणे येथील कौसा, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, नवी मुंबई, वसई, पालघर आणि इतर ठिकाणी घर आहेत. ठाणे आणि नवी मुंबईतील घरांकडे अर्जदारांनी मोठ्या प्रमाणावर भरणा केला आहे. म्हाडा येथे होत असलेल्या घरांसाठी आता मोठ्या प्रमाणावर लोक इच्छुक असल्याचं दिसून येत आहे.

अंतिम तारीख किती आहे? 

म्हाडा येथे मिळणाऱ्या घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्टच्या रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. १४ ऑगस्टच्या रात्री ११:५९ वाजेपर्यंत अनामत रकमेचा अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करता येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध होणार आहे. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्जदारांना दावे व हरकती नोंदविता येणार आहे.

१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी १० वाजता ठाणे येथे लॉटरी काढली येणार आहे. कोकण मंडळाच्या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळत असून अर्ज करण्याच्या प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पण याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विचारल्यावर त्यांनी मुदतवाढ दिली नसल्याचं सांगितलं आहे.