पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथे एका रस्त्याच्या मधोमध पाणी वर आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. पाईपलाईनच्या सदोष जोडणीमुळे ही घटना घडली असून, पुढील आठवड्यात उद्घाटन होणाऱ्या या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मागील आठवड्यापासून मुंबईसोबतच पुण्यात चांगला पाऊस पडत आहे. आता तर बऱ्याच ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मावळ तालुक्यात चांगला पाऊस झाला असून नदी नाले ओसंडून वाहायला लागले आहेत. आता तळेगाव दाभाडे येथील रस्त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विकासकामांच्या दर्जावर उभं राहील प्रश्नचिन्ह
तळेगाव दाभाडे येथील विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभं राहील आहे. रस्त्याच्या मधोमध पाणी वर आल्यामुळं नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे हि समस्या उदभवली आहे. पाइपलाइनची जोडणी करताना दोन पाईप एकमेकांना व्यवस्थित जोडले नव्हते. त्यामुळं या चाचणीच्या दरम्यान पाईप सटकला आणि रोडवर पाणी आलं.
पुढील आठवड्यात होणार होतं उदघाटन
पुढील आठवड्यात या पाईपलाईन योजनेचे उदघाटन होणार होत. या रोडबद्दलचं ट्विट रोहित पवार यांनी सोशल मीडियावर टाकलं आहे. या प्रकरणाची तळेगाव नगरपरिषदेने तातडीने दाखल घेतली गेली. रोडच्या वर पाणी आल्यामुळं या कामाची पोलखोल झाल्याचं दिसून आलं आहे. आता या रस्त्याची चौकशी होणार का हे आपल्याला लवकर दिसून येईल.


