रविवारच्या दिवशी मुसळधार पाऊस होणार, कोणत्या जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला?
कोकण आणि परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. भंडारा येथे तापमान ३४ अंश सेल्सियस राहील, तर पुणे जिल्ह्याच्या घाट भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, सातारा, कोल्हापूरसह काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी.

रविवारच्या दिवशी मुसळधार पाऊस होणार, कोणत्या जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला?
रविवारच्या दिवशी महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस
कोकण आणि परिसरात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे राज्यातील जोरदार पाऊस सुरु झाला असून चिपळूण येथे चांगला पाऊस झाला.
भंडारा येथे तापमाण वाढलं
भंडारा येथे तापमान ३४ अंश सेल्सियस इतकं राहील आहे. १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.
पुणे परिसरात झाला चांगला पाऊस
पुणे जिल्ह्याच्या घाट भागामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता झाली आहे. कोकण, सातारा, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पाऊस कुठं कुठं पडणार?
नाशिक घाटमाथा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती जिल्ह्यात तसेच उर्वरित काही ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी?
मुसळधार पावसामुळे खरीप आणि बारमाही पिकांना मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
पाण्याचा निचरा होण्यासाठी काय करावं?
पिकात पाणी साचू नये म्हणून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था निर्माण करावी. भातशेतीमधील अतिरिक्त पाणी टाकून देऊन त्यासाठी व्यवस्था उभारण्याची आवश्यकता आहे.