ओमराजे निंबाळकर सध्या खूप चर्चेत आहेत. उबाठा गटाला डच्चू देत आता शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. पण या सर्व प्रकाराचा ओमराजे निंबाळकरांना मोठा फटका बसला आहे.
Mumbai : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा भूकंप झाल्याच्या चर्चांनी वेग धरला होता. यामध्ये उबाठा गटातील सहा आमदार फुटल्याचा करण्यात येणारा दावा अखेर खरा ठरला. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उबाठामधील सहा खासदार फुटले. यापैकीच एक ओमराजे निंबाळकर देखील आहेत. धाराशिवचे खासदार असणारे ओमराजे निंबाळकर यांनी उबाठाची साथ सोडली. यानंतर आता ओमराजेंची पुढची रणनिती काय असणार हे पाहणे महत्वाचे आहेच. पण ओमराजेंनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. याशिवाय त्यांच्या सोशल मीडियावरील फोलोअर्समध्येही मोठी घट झाली आहे.

20 हजारांच्या आसपास फॉलोअर्स कमी
खासदार ओमराजे निंबाळकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याने अनेकांना पटलेले नाही. यामुळे ओमराजेंवर जोरदार टीका केली जात आहे. याशिवाय सोशल मीडियावरील त्यांची फॉलोअर्सची संख्या प्रचंड कमी झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये ओमराजेंचे 20 हजारांच्या आसपास फॉलोअर्स कमी झाले आहेत. त्यांच्या नावाचा ट्रेंडही सोशल मीडियात सुरू झाला आहे.
ओमराजेंची पक्ष सोडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया
ओमराजेंनी उबाठा सोडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. ओमराजेंनी म्हटले की, “पक्ष सोडण्याचा माझा निर्णय भावनिकदृष्या चुकीचा असू शकतो. पण राजकीय दृष्टीकोनातून पाहिल्यास तो योग्य आहे. याशिवाय मी मोठ्या धर्मसंकटात सापडलो आहे”
दुसऱ्या बाजूला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मोठा दबावही असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले. परंतु शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल लागल्यानंतर बघू. याशिवाय शिंदेंच्या शिवेसनेत जाण्याच्या निर्णयाबद्दल कार्यकर्त्यांसोबत देखील ओमराजे चर्चा करणार आहेत. पक्षप्रवेशासाठी पैसे घेण्यासह वाय प्लस सुरक्षा मिळाल्याचे दावे खोटे असल्याचेही ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
घराबाहेर कडक सुरक्षाव्यवस्था
आज पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणात निकाल लागणार आहे. याशिवाय उबाठाची साथ सोडल्यानंतर ओमराजेंच्या विरोधात संतापाची लाट उसळल्याने त्यांच्या घराबाहेर कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. ओमराजेंच्या गोवर्धनवाडी येथील घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कार्यालहायबाहेरही मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.


