शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदार फुटल्याने पक्षात मोठी फूट पडली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी एक भावनिक भाषण केले, ज्यात त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. त्यांनी आपल्या कुटुंबावर होणाऱ्या आरोपांचा उल्लेख करत, आता आपल्याला काही नको असल्याची भावना व्यक्त केली.
शिवसेना ठाकरे गटात आता मोठी फूट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ६ खासदार पक्षातून फुटले आहेत. त्यामुळं शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे हे भावुक झाल्याचं दिसून आलं आहे. त्यांनी आपलं मत यावेळी व्यक्त केलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर टीका केली आहे. आज माझ्यावर, पत्नीवर, आदित्यवर आणि तेजसवर आरोप केले जात आहेत. भाजपने दगा दिला म्हणून मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. मातोश्रीने काय करायचं नाही, नकोय आम्हाला काही असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
वॉर्डातील मतदारांची माफी मागतो
मी वॉर्डातील मतदारांची माफी मागतो असं त्यांनी म्हटलं आहे. मोदींची लाट असताना माझ्यावर विश्वास दाखवला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. हे आम्हाला डिवचलं जात आहे. मोदींच्या चेहऱ्यावर खासदार निवडून आले आहेत. मोदींचा चेहरा न वापरता आपापले ९ खासदार निवडून आले. एक तर चोरली. आता फोडाफोडी केली जातेय असं यावेळी ठाकरे यांनी म्हटलं आहे.


