मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. ठाकरे गट देशात आणि राज्यात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असून ते भ्रमात जगत आहेत, असे शिंदे म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात असताना विरोधक कायदा-सुव्यवस्था बिघडवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिवसेना सोडल्यापासून एकनाथ शिंदे हे कायमच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय अशी उपरोधिक टीका शिंदे यांनी ठाकरेंवर केली. सरकारच्या विरोधात आंदोलन असेल तर दरवेळी उबाठा गट हा पुढं असतो. अशावेळी आपली पोळी भाजून घ्यायचं काम हे ठाकरे गट करत आला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

हि सगळी मंडळी भ्रमात जगत आहेत

देशामध्ये आणि राज्यामध्ये अराजकता कशी पसरेल याकडं कायम या गटाचं लक्ष असत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तेत भारत देश पुढं जात आहे. आर्थिक व्यवस्था चांगली होत आहे. आपण आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत आहोत. ८० हजार लोकांना मोफत धान्य आणि ३२ कोटी लोकांना दारिद्र रेषेच्या वर आणण्याचं काम हे सरकारनं केलं आहे.

विरोधक देशात अराजकता पसरवत आहेत 

विरोधक हे देशात अराजकता पसरवण्याच काम करत आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याच्या या प्रयत्नाला भारतीय नागरिक बळी पडणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यातील आरोपींना अटक करून त्यांची चौकशी केली जात आहे.