मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने तो पुढे ढकलल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी राहुल गांधींवर टीका करत, परिवहन महामंडळाची जागा विकली जाणार नसून भाडेतत्त्वावर दिली जाईल, असेही स्पष्ट केले.

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कायमच विरोधकांकडून आरोप होत असतात. आज त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा केला. टीईटी परीक्षेचा पेपर फुटला, त्यामुळं तो पेपर पुढं ढकलल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पोलिसांनी पेपर होण्याच्या आधी या प्रकरणातील आरोपींना पकडून बेड्या ठोकल्या आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पुढील पेपरची तारीख लवकरच सांगणार 

पुढील पेपर कधी घ्यायचे याबद्दल काम चालू आहे. त्याबद्दलची तारीख आम्ही लवकरच जाहीर करू असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी याबाबत केलेलं ट्विट परदेशातून केलं होत का हे एकदा चेक करावं लागेल. कारण त्यांना सर्व गोष्टींची माहिती असतेच असं नाही. ते अनेकदा परदेशात असल्याचा उल्लेख यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

राहुल गांधींनी आधी स्वतःकडे पहावं 

राहून गांधींनी आधी स्वतःकडं पहावं, स्वतःच्या पक्षाकडं आणि सरकारकडं लक्ष द्यावं आणि त्यानंतर बोलावं असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. परिवहन महामंडळाकडे असणारी जागा विकली जाणार नाही. ती फक्त भाडेतत्वावर दिली जाईल असं पत्रकारांना सांगितलं. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि माहिती दिली.