- Home
- Maharashtra
- तुम्ही नायक आणि राजकारणी नालायक असं लोकांना वाटू लागलंय, मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनिल कपूरवर केला धक्कादायक आरोप
तुम्ही नायक आणि राजकारणी नालायक असं लोकांना वाटू लागलंय, मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनिल कपूरवर केला धक्कादायक आरोप
देवेंद्र फडणवीस: अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'नायक' चित्रपटावर भाष्य केले. या चित्रपटामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून, अनिल कपूर लायक आणि राजकारणी नालायक असे लोकांना वाटू लागल्याचे त्यांनी म्हटले.

तुम्ही नायक आणि राजकारणी नालायक असं लोकांना वाटू लागलंय, मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनिल कपूरवर केला धक्कादायक आरोप
अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिली आहेत. गोरेगावच्या फिल्म सृष्टीचं लवकरच रुपडं बदलवून टाकू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अक्षयने देवेंद्र फडणवीस यांना कोणता प्रश्न विचारला?
अक्षय कुमारने फडणवीस यांनी बोलताना म्हटलं आहे की, तुम्ही राजकारणातले स्टार आहात. तुमच्यासाठी चित्रपटसृष्टीतील अशी कोणती व्यक्ती किंवा चित्रपट आहे का ज्याचा तुमच्यावर प्रभाव पडला आहे?
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, चित्रपट आपल्याला संवेदना शिकवत असतात. एक चित्रपट मात्र असा आहे त्यानं माझ्या अडचणी वाढवल्या आहेत. त्यामध्ये अनिल कपूर एकदिवस मुख्यमंत्री होतात आणि पटपट काम करतात.
तुम्ही नायकसारखे काम का करत नाही?
मी जेव्हा लोकांमध्ये जातो त्यावेळी ते बोलताना तुम्ही नायक सारखे काम का करत नाही असं विचारतात. एका दिवसात त्या नायकाने किती काम केलं असं लोक सांगत असतात, अनिल कपूर भेटल्यावर मी त्यांना एक प्रश्न विचारला.
फडणवीस अनिल कपूरला काय म्हणाले?
मुख्यमंत्री फडणवीस हे अनिल कपूरला बोलताना म्हणाले की, तुम्ही लायक आणि आम्ही नालायक असं आता लोकांना वाटायला लागलं आहे. एका दिवसात तुम्ही इतक्या गोष्टी केल्या. एक बेंचमार्क सेट करण्याचं काम नायकने केलं आहे.
राजकारणातले रिअल हिरो कोण?
राजकारणातले रिअल हिरो कोण हा प्रश्न फडणवीस यांना विचारल्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की, मला हिरो नरेंद्र मोदी वाटतात. १० वर्षात २५ कोटी लोकांना दारिद्ररेषेतून काढण्याचं काम मोदी सरकारने केलं.

