वाल्मिक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी

| Published : Jan 01 2025, 11:43 AM IST / Updated: Jan 01 2025, 07:11 PM IST

walmik karad

सार

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार असलेला वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. त्याला केज येथे आणण्यात आले आणि न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायाधिशांनी त्याला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली.

बीड: जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेला आणि फरार असलेला वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात मंगळवारी शरण आला होता. त्याला रात्री ९.३० वाजता केज येथे आणण्यात आले. रात्री उशिरा केज येथील न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायाधिशांनी त्याला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. त्यानंतर रात्री १२.१० वाजता वाल्मिक कराडला बीडकडे रवाना करण्यात आले.

या प्रकरणी केज न्यायलयाने वाल्मिक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं वाल्मिक कराडचा मुक्काम १४ दिवस कोठडीतच असणार आहे. खंडणी प्रकरणतील आरोपी असलेल्या कराडला मंगळवारी रात्री केज न्यायालयात दाखल करण्यात आलं होत. न्यायाधिशांपुढे याप्रकरणी सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकिलासह वाल्मिक कराडच्या वकिलाने युक्तीवाद केला आहे. यानंतर न्यायालयानं १४ दिवसांच्या कोठडीचा निर्णय दिला आहे. त्यानंतर रात्री १२.१० वाजता वाल्मिक करडला बीडकडे रवाना करण्यात आले.

शरण येण्यापुर्वी व्हिडीओ केला जारी

शरण येण्यापूर्वी वाल्मिक कारड याने एक व्हिडिओ जारी केला, त्यात त्याने आपली बाजू मांडली. व्हिडीओत तो म्हणाला की, "केज पोलिस स्टेशनला खोटी फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनीचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझं नाव या प्रकरणात जोडलं जात आहे. पोलिस तपासात मी दोषी दिसलो तर न्यायालय जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे."

वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल

वाल्मिक कराड हे महाराष्ट्रामध्येच असल्याचं सांगण्यात येत होतं. त्याच्या शोधासाठी सीआयडीने त्यांची विशेष पथके पाठवली होती. सीआयडीने या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी ९ विशेष पथके तैनात केली आहेत. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार, वाल्मिक कराडचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत. वाल्मिक कराड नव्हे तर त्याच्या नातेवाईकांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. तब्बल दोन तास ही चौकशी सुरु होती.

आणखी वाचा-

बीटीएस पाहण्यासाठी मुलींचे 'अपहरण' नाटक

समृद्धी महामार्गावर ५० हून अधिक वाहनांचे टायर पंक्चर; नेमकं काय घडलं?