IAS पूजा खेडकरवर मोठी कार्यवाही, वाशिम येथील ट्रेनिंग रद्द करत मसूरी अ‍ॅकेडमीत हजर राहण्याचे निर्देशन

| Published : Jul 16 2024, 05:46 PM IST

FIR against IAS Puja Khedkar
IAS पूजा खेडकरवर मोठी कार्यवाही, वाशिम येथील ट्रेनिंग रद्द करत मसूरी अ‍ॅकेडमीत हजर राहण्याचे निर्देशन
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

IAS Puja Khedkar : महाराष्ट्रातील आयएएस पूजा खेडकरच्या विरोधात मोठी कार्यवाही करण्यात आली आहे. पूजा खेडकरची तत्काळ रुपात ट्रेनिंग रद्द करण्यात आली असून मसूरी अ‍ॅकेडमीमध्ये परतण्याचे निर्देशन देण्यात आले आहेत.

IAS Puja Khedkar :  महाराष्ट्रातील आयएएस पूजा खेडरकरवर मोठी कार्यवाही करत तिची तत्काळ रुपात ट्रेनिंग रद्द करण्यात आली आहे. याशिवाय पूजा खेडकरला मसूरी अ‍ॅकेडमीत परतण्याचे निर्देशन दिले आहेत. खरंतर, पूजा खेडकरची महाराष्ट्रात ट्रेनिंग सुरु होती. सध्या पूजा खेडकर वाशिममध्ये तैनात आहे. आता पूजाला सर्वकाही सोडून मसूरी आयएएस अ‍ॅकेडमीत रिपोर्ट करावे लागणार आहे.

पूजाची ट्रेनिंग तातडीने थांबवण्याचे आदेश
ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरवर बनावट अपगंत्व प्रमाणपत्र घेण्यासह अन्य काही आरोप लावण्यात आले होते. यानंतर केंद्र सरकारने देखील चौकशी समिती स्थापन केली. पूजाने केलेल्या प्रत्येक दाव्याचा तपास केला जात आहे. अशातच एक मोठा निर्णय घेत पूजाची ट्रेनिंग थांबवण्यात येण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील वाशिममध्ये सुरु असणारी ट्रेनिंग तत्काळ स्वरुपात रद्द केली आहे. यामुळे येत्या 23 जुलैपर्यंत लाल बहादूर शास्री राष्ट्रीय अ‍ॅकेडमी मसूरी येथे पूजाला रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले आहे.

अपंगत्व प्रमाणपत्रामुळे पोलखोल
पूजा खेडकरवर असा आरोप आहे की, तिने युपीएसएसी परीक्षेवेळी चुकीची माहिती दिली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार दावा केला जातोय की, आधी जे प्रमाणपत्र दिले होते त्यावर अपंगत्व असे नव्हते. पण युपीएसएसी परीक्षेसाठी जे प्रमाणपत्र जमा केले त्यावर अपंगत्व दाखवण्यात आले होते. दरम्यान, रुग्णालयाच्या रिपोर्टमध्ये अपंगत्वाचा दावा खरा असल्याचे सांगण्यात आले होत। खरंतर, दोन रिपोर्ट्स समोर आल्यानंतर पूजाची पोलखोल होताना दिसून येत आहे.

नावात आणि वयातही हेराफेरी केल्याचा आरोप
पूजाने आपले नाव आणि वय देखील बदलले आहे. दोन वेगवेगळ्या नावांचा पूजाने वापर केला आहे. वर्ष 2019 मध्ये युपीएसएसीच्या प्री साठी ज्यावेळी पूजाने अर्ज केला होता तेव्हा खेडकर पूजा दिलीप राव नावाने रजिस्ट्रेशन केले होते. नंतर आयएएसमध्ये नाव पूजा मनोरमा दिलीप खेडकर असे लावले. एवढेच नव्हे वर्ष 2020 मध्ये पूजाने आपल्या नावाआधी डॉत्टर आणि नावानंतर आपले वडील दिलीप राव यांचे नाव लिहिले होते. याशिवाय वर्ष 2023 मध्ये पूजाने आपले नाव बदलून मिस मनोरमा लिहिले होते.

आणखी वाचा : 

IAS पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण झाले बंद, अपंग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरलाही होणार शिक्षा

Trainee IAS Pooja Khedkar News : प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरचे पिंपरी चिंचवड कनेक्शन आलं समोर, डाव्या गुडघ्यात 7 टक्के अपंगत्वाचे मिळवलं प्रमाणपत्र