Pune IT Engineer ends life : हिंजवडी येथील २३ वर्षीय आयटी इंजिनिअरने कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं आहे. पोलिसांना घटनास्थळी चिठ्ठी सापडली असून, त्यात 'माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये' असे लिहिले आहे. 

पुणे : पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. हिंजवडी येथील एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअरने आयुष्य संपवलं आहे. पीयूष कवडे (वय २३, रा. वाकड, मूळ नाशिक) असे या तरुणाचे नाव असून, तो हिंजवडीतील ॲटलास कॉपको कंपनीत गेल्या वर्षभरापासून कार्यरत होता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

सोमवार, २८ जुलै रोजी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. पीयूषने कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून, त्यात "माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये," असा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सुसाइड नोटमध्ये आत्महत्येमागे कोणतेही विशिष्ट कारण नमूद केलेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार पीयूषने काही वैयक्तिक कारणांमुळे हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.