- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Alert : राज्यावर अवकाळीचे संकट, दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज!
Maharashtra Weather Alert : राज्यावर अवकाळीचे संकट, दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज!
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातून मान्सून २-३ दिवसांत परतणार असून, नवी मुंबईत तापमानात चढ-उतारामुळे आजारपण वाढले आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे.

महाराष्ट्र अतिवृष्टीने धुवून निघणार, हवामान खात्याच्या अंदाज वाचाल तर घाबरून जाल
महाराष्ट्रातून मान्सून परत जाण्याच्या मार्गावर आहे. २-३ दिवसांमध्ये मान्सून जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासाठी आता स्थिती अनुकूल असून नागरिकांनी चिंता करण्याची गरज नसल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
नवी मुंबईत तापमानात झाला चढउतार
नवी मुंबईत तापमानात चढ उतार झाल्याचं दिसून आलं आहे. दिवसा गरमी वाढली असून रात्रीची थंडी मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यामुळं नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना गरम कपडे घालण्याची सूचना देण्यात आली आहे.
आजारपणात झाली वाढ
या बदलत्या वातावरणामुळे लोक मोठ्या प्रमाणावर आजारी पडत असल्याचं दिसून आलं आहे. सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप आणि डोकेदुखीच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून आलं आहे.
हवामान तज्ज्ञ काय म्हणाले?
हवामान तज्ज्ञ म्हणाले की, दक्षिण भारतामध्ये पुढील ७ दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा मुसळधार पाऊस शेती आणि नागरिकांसाठी डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे.
दक्षिण भारतात मुसळधार पाऊस का होणार?
दक्षिण भारतामध्ये परत एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. त्यामुळं दक्षिण भारतात पाऊस होणार आहे.
मान्सून जाताच उकाडा वाढला
मान्सून गेल्यानंतर उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून आला आहे. आज आणि उद्या दोन दिवस महाराष्ट्रात पाऊस राहणार नाही. मात्र आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट राहणार आहे.

