महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे गटातील ६ खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे नेते त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असून, ओमराजे यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता सध्याच्या घडीला दिसून येत आहे. उबाठा गटातील ६ खासदार हे बंद करून शिंदे गटात प्रवेश करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. आता यामध्ये ओमराजे निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल लागल्यामुळं आता ते कोणता निर्णय घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

ठाकरेंच्या दोन शिलेदारांनी घेतली 

ओमराजे यांची भेट ठाकरे गटाचे आमदार वरून सरदेसाई आणि कैलास पाटील यांनी रात्री ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली आहे. या तीन नेत्यांमध्ये मध्यरात्री एक तास भेट झाली. हि भेट फक्त मित्रत्वाच्या नात्यानं झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

कैलास पाटील काय म्हणाले? 

खासदार ओमराजे निंबाळकर यांचे मित्र कैलास पाटील यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे की, आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आमचे प्रयत्न सुरु राहणार आहेत. ओमराजे यांनी २० वर्ष ज्या गोष्टीसाठी वीस संघर्ष केला, त्यात त्यांना न्याय मिळाला नाही. आम्ही पक्षप्रमुखांचा निर्णय घेऊन त्यांच्याकडं घेऊन गेलो होतो.

ओमराजे सोबत राहण्याचा दिला विश्वास 

ओमराजे निंबाळकर हे सोबत राहतील असं कैलास पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे. उद्धव ठाकरे यांची कालही तीच भावना होती, आजही तीच आहे आणि उद्याही तीच राहणार आहे. ओमराजे यांनी तातडीने कोणताही निर्णय न घेता विचार करायला वेळ मागितला आहे. आता यात नेमकं काय घडणार ते आपण पाहणार आहोत.