कसारा घाटात कंटेनरचा ब्रेक झाला फेल, पाच ते सहा गाड्यांमधील प्रवाशांना घाटातून...

| Published : Jul 14 2024, 04:03 PM IST

accident

सार

महाराष्ट्रातील कसारा घाटात एक भीषण अपघात झाला, ज्यात कंटेनरची ब्रेक फेल झाल्यामुळे सात गाडयांना टक्कर दिली. विकेंड असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक होते. सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली. 

महाराष्ट्रातील कसारा घाटामध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. येथे शनिवार रविवार जोडून सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले. या ठिकाणी सात गाडयांना टक्कर दिल्याची माहिती देण्यात आली आहे. येथे घटना घडल्यानंतर पोलिसांची वाहने आणि रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. येथे विकेंड असल्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती पण तसे झाले नाही. 

घटना कशी घडली? - 
येथे घडलेली घटना ही अतिशय भयानक असल्याचे सांगण्यात आले आहे. विकेंड असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक फिरायला येत असतात, ते येथे आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आणि वाहतुकीचे तीन तेरा वाजून जातात असेही सांगितले जाते. या ठिकाणी एका कंटेनरची ब्रेक फेल झाल्यामुळे त्याने समोर असणाऱ्या सात ते आठ गाडयांना टक्कर दिली आणि त्यामध्ये त्या गाडीत बसलेल्या प्रवाशांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या सर्व जखमी झालेल्या प्रवाशांना आसपासच्या दवाखान्यांमध्ये हलवण्यात आले आहे. 

ही घटना घडून गेल्यानंतर या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन पूर्णपणे हलून गेल्याचे दिसून आले. येथे वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाल्याचे दिसून आले. येथील अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोलीस, रुग्णवाहिका आणि इतर मदतीचे वाहने उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे जखमी झालेल्या नागरिकांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून भविष्यात खबरदारी घेणे आवश्यक असल्याच्चे यावेळी सरकारच्या लक्षात येऊन त्यांनी तात्काळ कारवाई करायला हवी.