महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीकरणाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ठाकरे बंधूंनी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे. अभिनेत्री तेजस्विनी देशपांडे यांनीही या मोर्चाला पाठिंबा दर्शवला असून, सोशल मीडियाद्वारे सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला हिंदी भाषेचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर तापले आहे. हिंदी भाषा सक्तीकरण केल्यामुळे मराठी भाषा धोक्यात येईल अशी शक्यता अनेकांकडून वर्तवली जात आहे. ठाकरे बंधू या प्रकरणार्त एकत्र आले असून त्यांनी याविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यावतीने मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना आणि मनसे या दोघांमध्ये याबाबतची चर्चा सुरु आहे.

तेजस्विनी देशपांडे काय म्हणते? 

अभिनेत्री तेजस्विनी देशपांडे यांनीही या मोर्चाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सोशल मीडियातून स्टोरीद्वारे सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असंही म्हटलं आहे. तिने पोस्टमध्ये मराठी भाषेसाठी निघणाऱ्या मोर्चाचे स्वागत केले. तेजस्विनी पंडित पोस्टमध्ये म्हणते, "मराठीसाठी, मराठी माणसांसाठी निघणाऱ्या मोर्चाचे स्वागत आणि त्याला पाठिंबा आहे. मोर्चा हा मराठी माणसासाठी असेल, त्याचे नेतृत्व मराठी माणूस करेल ही अपेक्षा. मी तर येईनच पण महाराष्ट्रावर मराठीवर प्रेम करणारे प्रत्येकाला माझी विनंती ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी. या आता स्थगिती नको तर निर्णय हवाय आणि जे मुंबई बाहेर आहेत आणि ज्यांना प्रत्यक्ष न शक्य नाही त्यांनी सोबत जोडलेल्या गुगल फॉर्म मधून त्रिभाषा सूत्राला हिंदी सक्तीला विरोध नोंदवा.

पोस्टरमध्ये काय सांगितलं? 

तेजस्विनी देशपांडे हिने मोर्चा मराठी माणसाचा मराठी भाषेचा महाराष्ट्राचा स्मितेचा अशा आशयाचे एक पोस्टर इंस्टाग्राम वर शेअर केले. तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये मोर्चाची वेळ आणि ठिकाण सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटी असं सांगितलं आहे. तेजस्विनी देशपांडे आणि राज ठाकरे यांच्यात मैत्रीचे संबंध असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.