- Home
- Maharashtra
- Swayam Siddha Yojana: महिलांसाठी सुवर्णसंधी! स्वतःचा व्यवसाय सुरू करा, सरकार देतंय ₹10 लाखांपर्यंत कर्ज; अर्ज कुठे व कसा करायचा?
Swayam Siddha Yojana: महिलांसाठी सुवर्णसंधी! स्वतःचा व्यवसाय सुरू करा, सरकार देतंय ₹10 लाखांपर्यंत कर्ज; अर्ज कुठे व कसा करायचा?
Swayam Siddha Yojana: महाराष्ट्र शासनाची 'महिला स्वयंसिद्धी योजना' महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ५ ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देत आहे. या योजनेद्वारे महिला विविध व्यवसाय सुरू करून स्वावलंबी बनू शकतात.

स्त्रीशक्तीसाठी खास योजना, महिला स्वयंसिद्धी योजना
राज्यातील महिलांसाठी एक दिलासादायक बातमी! महाराष्ट्र शासन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्योजकीय क्षमता विकसित करण्यासाठी ‘महिला स्वयंसिद्धी योजना’ राबवत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते, जे विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयोगात आणता येते.
कोणते व्यवसाय सुरू करता येतील?
या योजनेंतर्गत महिलांना खालील व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिलं जातं.
दुग्धव्यवसाय
कुक्कुटपालन (कोंबडीपालन)
मत्स्य व्यवसाय
फळे आणि भाजीपाला विक्री
टेलरिंग युनिट
अॅल्युमिनियम फॅब्रिकेशन
ऑटो स्पेअर पार्ट्स
हार्डवेअर व पेंट शॉप
लाकडी वस्तू उत्पादन
वीटभट्टी व्यवसाय
ग्लास/फोटो फ्रेम सेंटर
या सर्व व्यवसायांतून महिलांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण करता येतो आणि स्वावलंबनाकडे पाऊल टाकता येते.
पात्रता व अटी काय आहेत?
अर्ज करणारी महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी
वय 18 ते 60 वर्षांदरम्यान असावे
अर्जदार गरीब रेषेखालील किंवा मध्यम उत्पन्न गटातील असावा
अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय महिलांना प्राधान्य दिलं जातं
कर्ज व व्याजदर माहिती
कर्जाची रक्कम: 5 ते 10 लाख रुपये
व्याजदर: 12% निश्चित
व्याजाचा परतावा
इतर मागास प्रवर्गातील बचतगटातील महिलांना ओबीसी महामंडळाकडून व्याज परतावा दिला जातो
इतर महिलांना शासनाच्या विविध योजनांद्वारे मदत मिळते
अर्ज कसा करावा?
महिलांनी आपल्या जात प्रमाणपत्राच्या आधारे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया संबंधित विभागाच्या अधिकृत पोर्टलवर किंवा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित केंद्रांमार्फत केली जाते.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड / इतर ओळखपत्र
रहिवासी प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
जातीचा दाखला (ओबीसी/SC/ST साठी)
कर्ज मंजुरी पत्र (बँकेकडून)
बचत गटाचे सर्व कागदपत्रे
प्रशिक्षण व मार्गदर्शन सुविधा
महिलांना व्यवसायाची तयारी करण्यासाठी सरकारतर्फे शिबिरे, हेल्पडेस्क, प्रशिक्षण सत्र आयोजित केली जातात. विशेषतः ग्रामीण भागात बचतगट उभारण्यावर भर दिला जातो. त्यामुळे महिलांना केवळ आर्थिक मदतच नाही, तर व्यवसाय सुरू करण्याचे ज्ञान व मार्गदर्शनही मिळते.
महिला सक्षमीकरणाकडे ठाम पाऊल
महिला स्वयंसिद्धी योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे महत्त्वाचे पाऊल आहे. स्वतःचा व्यवसाय उभारून महिलांना केवळ उत्पन्नाचा मार्ग मिळतोच, पण त्यांचं आत्मभान, आत्मविश्वास आणि समाजातील स्थानही अधिक बळकट होतं.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
आपल्या जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात किंवा राज्यशासनाच्या अधिकृत वेबसाइटवर अधिक माहिती मिळवता येईल. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर आजच तयारी सुरू करा. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ही सुवर्णसंधी गमावू नका!

