MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • शिवनेरी-शिवशाहीनंतर आता ‘राजमाता जिजाऊ’ बस; एसटीचा ऐतिहासिक निर्णय, जाणून घ्या कधीपासून धावणार

शिवनेरी-शिवशाहीनंतर आता ‘राजमाता जिजाऊ’ बस; एसटीचा ऐतिहासिक निर्णय, जाणून घ्या कधीपासून धावणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ताफ्यात 'राजमाता जिजाऊ' नावाची नवी, अत्याधुनिक बस दाखल होत आहे. ५५ आसनी आणि अधिक आरामदायी असलेल्या या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सेवेत येणार असून प्रवाशांना सुखकर प्रवासाचा अनुभव देतील.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 09 2026, 05:50 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
एसटीचा नवा 'रुबाब'! शिवनेरी, शिवशाहीनंतर आता धावणार 'राजमाता जिजाऊ' बस
Image Credit : social media

एसटीचा नवा 'रुबाब'! शिवनेरी, शिवशाहीनंतर आता धावणार 'राजमाता जिजाऊ' बस

मुंबई : महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ताफ्यात लवकरच नव्या, अत्याधुनिक आणि अधिक आरामदायी बस दाखल होणार असून, या सेवेला ‘राजमाता जिजाऊ’ असे प्रेरणादायी नाव देण्यात आले आहे. या नव्या बससेवेमुळे प्रवाशांना प्रवासाचा नवा अनुभव मिळणार आहे. 

24
एसटीच्या गौरवशाली परंपरेत नवा अध्याय
Image Credit : social media

एसटीच्या गौरवशाली परंपरेत नवा अध्याय

महाराष्ट्राच्या इतिहासातील थोर आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना आदरांजली वाहण्यासाठी एसटी महामंडळाने या नव्या बससेवेला राजमाता जिजाऊ असे नाव दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांच्या बसेसद्वारे एसटीने इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ साधला आहे. आता त्याच परंपरेत राजमाता जिजाऊ बसची भर पडली असून, एसटीच्या प्रवासाला नवा आयाम मिळणार आहे. 

Related Articles

Related image1
MHADA Pune Lottery: प्रतीक्षा संपली! पुण्यात हक्काचं घर मिळवण्याची मोठी संधी; म्हाडा सोडतीची तारीख आणि वेळ जाहीर!
Related image2
पुणे-मुंबईपासून जवळच या ठिकाणी साजरा करा Valentine Day, प्रेमाला चढेल गुलाबी रंग
34
प्रवाशांच्या सोयींना विशेष प्राधान्य
Image Credit : our own

प्रवाशांच्या सोयींना विशेष प्राधान्य

राज्यभरातील वर्दळीच्या मार्गांवर प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागू नये, यासाठी एसटी महामंडळाने 3×2 आसन रचनेच्या 55 आसनी अत्याधुनिक बसेस खरेदी केल्या आहेत.

या बसमध्ये प्रशस्त आणि आरामदायी आसन व्यवस्था, सुधारित अंतर्गत रचना तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. 

44
कधीपासून सुरू होणार सेवा?
Image Credit : Getty

कधीपासून सुरू होणार सेवा?

नव्या राजमाता जिजाऊ बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. भगव्या आणि पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बस आकर्षक दिसणार असून, एसटीच्या ओळखीला नवी झळाळी देणार आहेत. एसटी महामंडळाचा हा निर्णय केवळ वाहतूक सेवेपुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा गौरव करणारा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Weather Alert: महाराष्ट्रावर 'दुहेरी' संकट! कुठे पावसाचा कडकडाट तर कुठे उष्णतेची लाट; १४ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी
Recommended image2
सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांबाबत राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! १ जानेवारी २०११ पूर्वीची १५०० चौ. फुटांपर्यंतची घरे होणार नियमित
Recommended image3
Ashok Kharat Case : ‘अंकशास्त्रज्ञ’ अशोक खरात गणितात नापास! शैक्षणिक वास्तव समोर आल्याने चर्चांना उधाण
Recommended image4
Pimpri Chinchwad Traffic Advisory : रामनवमी उत्सवासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक निर्बंध; अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्गांची घोषणा
Recommended image5
Ashok Kharat Case : महाराष्ट्राचा 'एपस्टीन'! विद्यार्थिनी, गर्भवती महिलांना बनवलं शिकार; अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे
Related Stories
Recommended image1
MHADA Pune Lottery: प्रतीक्षा संपली! पुण्यात हक्काचं घर मिळवण्याची मोठी संधी; म्हाडा सोडतीची तारीख आणि वेळ जाहीर!
Recommended image2
पुणे-मुंबईपासून जवळच या ठिकाणी साजरा करा Valentine Day, प्रेमाला चढेल गुलाबी रंग
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved