MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • MHADA Pune Lottery: प्रतीक्षा संपली! पुण्यात हक्काचं घर मिळवण्याची मोठी संधी; म्हाडा सोडतीची तारीख आणि वेळ जाहीर!

MHADA Pune Lottery: प्रतीक्षा संपली! पुण्यात हक्काचं घर मिळवण्याची मोठी संधी; म्हाडा सोडतीची तारीख आणि वेळ जाहीर!

MHADA Pune Lottery: अनेक दिवसांपासून रखडलेली म्हाडा पुणे विभागातील 4,186 घरांची सोडत अखेर 10 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे प्रलंबित असलेली ही प्रक्रिया आता पार पडणार असून, 2.15 लाखांहून अधिक अर्जदारांची प्रतीक्षा संपणार आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 09 2026, 04:47 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
पुणेकरांचे घराचे स्वप्न साकार होणार
Image Credit : our own

पुणेकरांचे घराचे स्वप्न साकार होणार

पुणे : पुण्यात स्वतःचे हक्काचे घर असावे, असे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली म्हाडाच्या पुणे विभागातील घरांची सोडत अखेर जाहीर करण्यात आली असून, उद्या 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता ही बहुप्रतिक्षित सोडत काढली जाणार आहे. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया प्रलंबित होती. मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर, जिल्हा परिषद सभागृहात सोडत पार पडणार असून, म्हाडासाठी अर्ज केलेल्या नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

26
4,186 सदनिकांसाठी 2.15 लाखांहून अधिक अर्ज
Image Credit : our own

4,186 सदनिकांसाठी 2.15 लाखांहून अधिक अर्ज

म्हाडाच्या पुणे मंडळाअंतर्गत एकूण 4,186 घरांसाठी 2 लाख 15 हजार 965 अर्ज दाखल झाले आहेत. या सोडतीची जाहिरात 11 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या योजनेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीतील घरांचा समावेश आहे. त्यामध्ये 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील 3,322 सदनिका, 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील 864 सदनिका यांचा समावेश करण्यात आला आहे. 

Related Articles

Related image1
PM Kisan Yojana 22th Installment: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! २२ व्या हप्त्याचे ₹२००० 'या' तारखेला खात्यात येणार; तुमचे नाव यादीत आहे का? असे तपासा!
Related image2
Maharashtra Land Purchase Guide: जमीन खरेदी करताय? सातबाऱ्यावरील 'हे' दोन शब्द तपासा, अन्यथा कष्टाचे पैसे पाण्यात; मालकी हक्कही ठरेल बेकायदेशीर!
36
अर्जदारांसाठी दोनदा मुदतवाढ
Image Credit : Twitter

अर्जदारांसाठी दोनदा मुदतवाढ

अर्ज भरताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन म्हाडाकडून दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने सोडत पुढे ढकलण्यात आली. सुरुवातीला डिसेंबरमध्ये सोडत होण्याची शक्यता होती; मात्र महापालिका निवडणुका जाहीर झाल्याने हा निर्णय लांबणीवर पडला.

सोडतीसाठी म्हाडाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. मात्र, यामुळे मतदारांवर परिणाम होऊ शकतो, असे सांगत आयोगाने परवानगी नाकारली. अखेर जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर येत्या मंगळवारी सोडत घेण्याचा निर्णय झाला. 

46
488 कोटी रुपयांची अनामत रक्कम जमा
Image Credit : Twitter

488 कोटी रुपयांची अनामत रक्कम जमा

या सोडतीस नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, अनामत रकमेच्या स्वरूपात सुमारे 488 कोटी रुपये जमा झाले आहेत. सप्टेंबर 2025 पासून ही रक्कम म्हाडाकडेच अडकून असल्याने सोडत कधी होणार, याबाबत अर्जदारांकडून सतत विचारणा केली जात होती. आता मात्र ही प्रतीक्षा अखेर संपणार आहे. 

56
घरबसल्या पाहता येणार सोडतीचे थेट प्रक्षेपण
Image Credit : Twitter

घरबसल्या पाहता येणार सोडतीचे थेट प्रक्षेपण

अर्जदारांची गर्दी टाळण्यासाठी म्हाडाकडून सोडतीचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजल्यापासून म्हाडाच्या अधिकृत YouTube चॅनेलवर ही सोडत थेट पाहता येणार आहे. तसेच पात्र अर्जदारांना निकाल पाहण्यासाठीची लिंक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे पाठवण्यात आली आहे. 

66
पुण्यात हक्काचं घर मिळवण्याची मोठी संधी
Image Credit : Twitter

पुण्यात हक्काचं घर मिळवण्याची मोठी संधी

निवडणूक आचारसंहिता आणि तांत्रिक अडचणींमुळे दोन वेळा पुढे ढकललेली ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, पुणेकरांच्या घराच्या स्वप्नाला आकार देण्याचा क्षण जवळ आला आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या
पुण्याच्या बातम्या

Recommended Stories
Recommended image1
New Kia Seltos : नवीन सेल्टॉसच्या या व्हेरियंटला प्रचंड मागणी, किती आहे वेटिंग?
Recommended image2
एआय तुमच्याकडून या ४ नोकऱ्या कधीच हिरावून नाही घेणार, यामागे काय आहे कारण
Recommended image3
महिलांसाठी सोन्याचे हे टॉप्स करा खरेदी, पाहूनच बायको होईल वेडी
Recommended image4
Income Tax Rules 2026 : 1 एप्रिल 2026 पासून नवा आयकर कायदा लागू, ITR-1 ते ITR-7 मध्ये मोठे बदल
Recommended image5
व्वा! टाटाची ही मध्यमवर्गीयांची कार देते 27 किमी मायलेज, बजेटमध्ये आताच खरेदी करा!
Related Stories
Recommended image1
PM Kisan Yojana 22th Installment: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! २२ व्या हप्त्याचे ₹२००० 'या' तारखेला खात्यात येणार; तुमचे नाव यादीत आहे का? असे तपासा!
Recommended image2
Maharashtra Land Purchase Guide: जमीन खरेदी करताय? सातबाऱ्यावरील 'हे' दोन शब्द तपासा, अन्यथा कष्टाचे पैसे पाण्यात; मालकी हक्कही ठरेल बेकायदेशीर!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved