उजनी धरण ओवरफ्लो, 40 हजार क्युसेकचा विसर्ग; पंढरपूरसह काही गावांना पुराचा धोका

| Published : Aug 04 2024, 08:34 PM IST

ujani dam
उजनी धरण ओवरफ्लो, 40 हजार क्युसेकचा विसर्ग; पंढरपूरसह काही गावांना पुराचा धोका
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

एका बाजूला उजनी धारण ओव्हरफ्लो होत असताना सातारा जिल्ह्यातील वीर धरणातूनही नीरा नदीत 42 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

 

सोलापूर : उजनी धरण तुडुंब भरू लागले असून येणाऱ्या पाण्याची अवाक 1 लाख क्युसेक पर्यंत जाऊ लागल्याने रविवारी सायंकाळी धरणातून तब्बल 20 हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. भीमा नदीत हा विसर्ग सोडण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून व्यास नारायण वसाहतीमधील 500 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. रविवारी सकाळी उजनी धरणाने 90 टक्क्यांची पातळी गाठली असताना वरुन धरणाकडे येणाऱ्या पाण्याची अवाक 1 लाख क्युसेकपर्यंत पोहोचल्याने धरण प्रशासनाने धरणातून सुरुवातीला 20 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाण्याची पातळी वाढल्याने आता 40 हजार क्यूसेक गतीने पाणी नदी पात्रत सोडले जाणार आहे.

पंढरपूर शहर व नदीकाठच्या गावांना बसणार पुराचा तडाखा

एका बाजूला उजनी धारण ओव्हरफ्लो होत असताना सातारा जिल्ह्यातील वीर धरणातूनही नीरा नदीत 42 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या नीरा नरसिहपूर येथे भीमा आणि नीरा नदीचा संगम होऊन हे सर्व पाणी पंढरपूरकडे येत असते. सध्या याच वीर धरणातून सोडलेल्या पाण्याने भीमा दुथडी भरून वाहत असताना आता यात उजनी धरणाचे पाणी येण्यास सुरुवात झाल्यास पंढरपूरचा पुराचा धोका वाढणार आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात असाच पाऊस सुरू राहिल्यास पुढच्या दोन दिवसात पंढरपूर शहर व नदीकाठच्या गावांना पुराचा तडाखा बसणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनही अलर्ट मोडवर आहे.

500 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

वीर आणि उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात केल्याने पंढरपूर शहरातील व्यास नारायण वसाहतीतील 500 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास प्रशासनाने केली सुरुवात आहे. रविवारी रात्रीपासून पुन्हा चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार असल्याने व्यास नारायण भागातील घरात पाणी शिरणार असल्याने येथील कुटुंबीयांना प्रशासनाने स्थलांतरित करण्यात येत आहे.

उजनी धरण 91 टक्के भरले, 40 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू

उजनी धरणाचे 16 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडले असून उजनी धरणातून भीमा पात्रात 21 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. मात्र रात्री 8 नंतर 40 हजार क्युसेकने हा विसर्ग करण्यात येत आहे. उजनी धरण 89 टक्क्यापेक्षा अधिक भरले असून भीमा काठाच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरण सध्या 91 टक्के इतकं भरले असल्याने उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये सायंकाळी 5 पाच वाजल्यापासून 21 हजार 600 क्युसेक इतका विसर्ग सुरु करण्यात आला होता. दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणाच्या भीमा नदी पात्रात 95 हजार 200 क्युसेक इतका विसर्ग येत असल्याने उजनी धरण व्यवस्थापनाने हा निर्णय घेतलाय. उजनी धरणाचे 16 दरवाजे हे 40 सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत. उजनी धरण हे एकूण 117 टीएमसी क्षमतेचा असून सध्या उजनी धरणात 111 पूर्णांक 77 टीम्स इतका पाणीसाठा झाला आहे.

आणखी वाचा : 

पुण्यात पुन्हा पूरस्थिती, खडकवासला धरण 65% खाली करा; अजित पवार यांच्या सूचना