पुण्यात पुन्हा पूरस्थिती, खडकवासला धरण 65% खाली करा; अजित पवार यांच्या सूचना

| Published : Aug 04 2024, 02:51 PM IST

Pune Heavy Rain

सार

खडकवासला धरण हे 65 टक्केपर्यंत खाली करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहेत. त्यामुळे धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे काम वेगाने करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Pune Rain Update : पुण्यात धरण परिसरात तुफान पाऊस सुरू आहे. धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे. गेल्या वेळी झाली तशी परिस्थिती यावेळी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगर भागात सोसायटींमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली. सोसायटीमधील नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. दरम्यान पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग वाढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे तसेच निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

'खडकवासला धरण 65 टक्क्यापर्यंत खाली करा'

खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरण भरू लागली आहेत. धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातून विसर्ग करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या आहे. धरणात 65 टक्केपर्यंत पाणी सोडावे असे अजित पवारांनी सांगितले. तसेच पाणी सोडताना नागरिकांना सूचित करावे असे देखील अजित पवारांनी सांगितले आहे. खडकवासला धरण हे 65 टक्केपर्यंत खाली केले तर रात्री पाऊस पडला तर धरणात पाणी राहील असे अजित पवारांनी सूचना दिल्या आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री?

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे आणि जिल्हा परिसरात रव जोराचा पाऊस होत असून या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत.

नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर करा : मुख्यमंत्री

पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरातील पूररेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे. या विसर्गामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बाधित होऊ शकणाऱ्या एकतानगर, दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजी नगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरीस ब्रीज, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प , रावेत, बालेवाडी गावठाण, ज्युपीटर हॉस्पिटल परिसर, कपिल मल्हार परिसर, बाणेर, बावधन, संगमवाडी इत्यादी सखल भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

निवासस्थाने, खाण्याची सोय करा : मुख्यमंत्री

संपूर्ण प्रशासनाने या काळात अलर्ट राहावे. लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, निवारा केंद्रांमध्ये त्यांच्यासाठी सर्व सुविधांची उपलब्धता करून देणे यासाठी सर्व प्रशासनाने समन्वयाने काम करावे. हवामान खात्याकडून येणाऱ्या विविध सूचनांची दखल घेऊन त्याची लोकांना त्वरित माहिती देण्यात यावी. सर्वांनी सतर्क राहून लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

आणखी वाचा :

सेल्फीच्या नादात जीव धोक्यात!, 100 फूट दरीत कोसळली तरुणी; पाहा घटनेचा थरार