- Home
- Maharashtra
- Nashik Kumbh Mela Bharti 2025: सरकारी नोकरीची उत्तम संधी! सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणात ७६ पदांची भरती; मंत्रालयात स्वतंत्र कक्षाचीही स्थापना
Nashik Kumbh Mela Bharti 2025: सरकारी नोकरीची उत्तम संधी! सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणात ७६ पदांची भरती; मंत्रालयात स्वतंत्र कक्षाचीही स्थापना
Nashik Kumbh Mela Bharti 2025: नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी राज्य सरकारने ७६ नवीन पदांच्या निर्मितीस मान्यता दिली. यापैकी ५२ पदे नियमित तर २४ पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत.

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणात ७६ पदांची भरती
Nashik Kumbh Mela Bharti 2025: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2026-27 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्य आयोजनासाठी आता कामांना खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे. राज्य सरकारने सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणासाठी ७६ नवीन पदांच्या निर्मितीस मान्यता दिली असून, या माध्यमातून अनेकांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.
पूर्णवेळ आयुक्त पदभारावर
पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त शेखर सिंग यांनी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे पूर्णवेळ आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी शुक्रवारी (दि. १० ऑक्टोबर) विभागीय आयुक्त आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून पदभार स्वीकारला.
७६ पदांची भरती, संधी तुमच्यासाठी!
राज्य सरकारने दिलेल्या मान्यतेनुसार, ७६ पदांपैकी ५२ पदे नियमित स्वरूपातील असतील, तर २४ पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत. ही भरती पुढील प्रकारे करण्यात येणार आहे.
नियमित पदे – शासकीय सेवा नियमानुसार
प्रतिनियुक्ती / निवृत्त अधिकाऱ्यांमधून काही पदे
कंत्राटी पदे – थेट जाहिरात किंवा मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्थांमार्फत
मंत्रालयात 'कुंभमेळा कक्ष' स्थापन
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी केवळ नाशिकच नव्हे, तर मुंबईतील मंत्रालयातही स्वतंत्र ‘कुंभमेळा कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षामार्फत सर्व प्रशासकीय कामे अधिक गतिमान आणि समन्वयपूर्वक पार पाडली जातील.
कुंभमेळ्यासाठी तयारी जोमात
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या 2026-27 च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र कायद्याच्या आधारे प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. प्रारंभी महापालिका आणि इतर शासकीय यंत्रणांमार्फत कामांना सुरुवात झाली होती. मात्र, स्वतंत्र अधिकारी-कर्मचारी वर्गाची गरज लक्षात घेता, प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी नवीन पदनिर्मितीचा प्रस्ताव सादर केला, जो आता मंजूर झाला आहे.

