शरद पवार यांच्या अहमदनगरमधील सभेत वाटली हिटलरची पत्रके, काय आहे त्या पत्रकामध्ये?

| Published : Apr 19 2024, 05:16 PM IST

Sharad Pawar Party New Symbol by EC

सार

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे निलेश लंके उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी सभा घेतली. त्यांच्या सभेत वाटण्यात आलेली हिटलरच्या पत्रकांनी सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. 

महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील निवडणुका या हाय होल्टेज होताना दिसत आहेत. या लढतींकडे पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे लक्ष असून ते येथे आपल्याच पक्षाचे सीट कसे निवडून आणता येईल यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. यावेळी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होत असल्याचे दिसून येत आहे. येथील लढत माजी खासदार सुजय विखे आणि माजी आमदार निलेश लंके यांच्यामध्ये होत आहे. येथे निलेश लंके यांच्यासाठी शरद पवार यांची सभा होत असून या सभेमध्ये वाटण्यात आलेले पत्रके चर्चेचा विषय ठरले आहेत. 

कोणती पत्रके वाटण्यात आली? - 
 अहमदनगरमध्ये शरद पवार यांच्या सभेमध्ये माझा अॅडॉल्फ हिटलर विषयीचा अभ्यास व निरीक्षण या विषयावरील पत्रकांचे वाटप करण्यात आले आहे. या पत्रकामध्ये हिटलरचे मुद्दे मांडण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यामधून टार्गेट करण्यात आले आहे. या पत्रकामध्ये कोणते मुद्दे देण्यात आले आहेत, ते आपण समजून घेऊयात. 

पत्रकातील 23 मुद्दे

1) हिटलरने लग्न केले नव्हते.

2) हिटलर एका देशातील विशिष्ट धर्मातील लोकांचा शत्रू मानत असे.

3) हिटलरच्या समर्थकांना हिटलरची का सहन व्हायची नाही.

4) हिटलर लहानपणी रंग विकण्याचे, चित्र काढण्याचे काम करायचा.

5) हिटलरनी प्रसार माध्यमे आपल्या ताब्यात ठेवली होती.

6) हिटलरने सर्व कामगार आणि इतर चळवळी मोडून काढल्या.

7) हिटलर आपल्या विरोध करणाऱ्याला देशद्रोही ठरवत असे.

8) हिटलर साधा कार्यकर्ता म्हणून नाजी पक्षात घुसला आणि नंतर सर्व नाजी पक्षात जेष्ठांना डावलून सत्ता काबीज केली.

9) हिटलर सत्ता काबीज करताना प्रचारात देशातील सर्व समस्या चुटकी सरशी निवारण करील असे सांगायचा.

10) हिटलरने सत्तेत आल्यावर समस्यांचे निवारण तर केले नाहीच, पण देश बरबाद केला.

11) हिटलर प्रचारात नेहमी "God Times Will Com" म्हणजेच "अच्छे दिन आयेंगे" असे सांगत असे.

12) हिटलरने पार्टी जिंकल्यावर त्याने पहिल्यांदा संसदेत प्रवेश केल्यावर तो खूप रडला होता.

13) हिटलरनी खोटं बोलून सत्ता मिळवली होती.

14) हिटलरला टापटीत राहायला, नटायला आवडायचे.

15) हिटलर खोटे बोलण्याच्या कलेमध्ये तरबेज होता.

16) हिटलर भाषणांमध्ये कायम मी मी करायचा.

17) हिटलरला रेडिओवर भाषण द्यायचा शोक होता.

18) हिटलरने कधीच पत्रकार परिषद घेतली नाही.

19) हिटलरचा त्याच्या मंत्रीमंडळावर विश्वास नव्हता.

20-) हिटलर आपल्या भाषणांमध्ये नेहमी फ्रेंड-फ्रेंड म्हणजे मित्रो-मित्र-मित्रो असे म्हणत असे.

21) हिटलरचा फोटो काढून घ्यायला खूप आवडायचे.

22) विशेष म्हणजे हिटलर प्रत्येक निवडणुकीच्या आधी देशांच्या पारंपारिक शत्रू विरुद्ध कुरापती काढून युद्ध करायचा आणि त्याची सहानुभूती घेऊन तो निवडणूक जिंकून यायचा अशा प्रकारे तो जनतेला मूर्ख बनवत होता.

23) हिटलरने जनतेच्या आक्रोश नंतर स्वतः आत्महत्या केली.
आणखी वाचा - 
इलॉन मस्क यांनी इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या तणावाबाबत केले ट्विट, पाहून तुम्ही म्हणाल...
नेस्ले कंपनीच्या प्रोडक्टमध्ये साखरेचं प्रमाण जास्त, फूड फार्मरने केले 'हे' गंभीर आरोप

Read more Articles on