नेस्ले कंपनीच्या प्रोडक्टमध्ये साखरेचं प्रमाण जास्त, फूड फार्मरने केले 'हे' गंभीर आरोप

| Published : Apr 19 2024, 01:23 PM IST

nestley pic
नेस्ले कंपनीच्या प्रोडक्टमध्ये साखरेचं प्रमाण जास्त, फूड फार्मरने केले 'हे' गंभीर आरोप
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

नेस्ले कंपनीच्या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर शुगर असल्याचे आढळून आले आहे. या कंपनीच्या उत्पादनांचा व्हिडीओ फूड फार्मरने त्याच्या अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. 

नेस्लेच्या उत्पादनांमध्ये साखर जास्त प्रमाणात मिसळल्याची बातमी समोर आली आहे. आता याबाबत केंद्र सरकारने अधिक चौकशीचे आदेश दिले आहेत. भारत देशासोबतच आशिया आणि आफ्रिका खंडातील देशांमध्ये नेस्ले या ब्रँडची विक्री होत असते. येथे विक्री होणाऱ्या नेस्लेच्या प्रोडक्टमध्ये साखर आणि मधाचा समावेश असल्याची बातमी आली आहे. आता राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने यावर कारवाई केली आहे. या ब्रॅंडने प्रॉडक्टची विक्री करताना केलेल्या डाव्यांची चौकशी केली जात आहे. 

आता FSSAI चौकशी करेल - 
 FSSAI यांनी म्हटले आहे की ते या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करणार आहेत. त्यांनी तपासणी केल्यानंतर अहवाल पुढच्या समितीकडे पाठवण्यात येईल आणि त्यामधूनही दोषी ठरल्यास नेस्लेवर कारवाई केली जाणार आहे. नेस्ले सोबत इतर कंपन्यांच्या प्रोडक्ट्ची चाचणी केली जाणार असून त्यामधील साखर तपासणी करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. 

NCPCR ने FSSAI ला नोटीस दिली
 NCPCR ने FSSAI ला दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, बेबी फूड उत्पादनांमध्ये जास्त साखर असल्यास मुलांचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत, बाळ अन्न गुणवत्ता आणि सुरक्षिततेसाठी कठोर मानके पूर्ण करणे आवश्यक आहे.

जाणून घ्या काय म्हणाले नेस्ले
नेस्लेने या संदर्भात म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षांत त्यांनी 30% ने खर्च कमी केला आहे. अशा परिस्थितीत सतत पोर्टफोलिओ तपासा. नेस्ले इंडिया गुणवत्ता, सुरक्षितता आणि चव यांच्याबाबत कधीही तडजोड करू शकत नाही.

View post on Instagram
 

फूड फार्मर अकाऊंटवरून व्हिडीओ केला पोस्ट - 
फूड फार्मर अकाऊंटवरून व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. त्याने नेस्ले ही कंपनी सदर प्रोडक्टमध्ये added sugar टाकत असल्याची माहिती दिली. अशा प्रकारे sugar टाकणे दोन वर्षांखालील मुलांच्या शरीरासाठी योग्य नाही. फूड फार्मरने त्याच्या इंस्टाग्राम व्हिडिओमधून याबद्दलची माहिती दिली असून यामुळे नेस्लेवर भविष्यात मोठी कारवाई होऊ शकते. 
आणखी वाचा - 
Israel Iran Conflict : इस्रायलचा इराणवर हल्ला, इस्फहान शहरातील विमानतळावर मोठा स्फोट
Dubai Rains : दुबईत पावसाचा हाहाकार, विमानतळ पाण्याखाली जाण्यासह ओमानमध्ये 18 जणांचा मृत्यू