Sanjay Raut on Pahalgam Terror Attack : संजय राउत यांनी पहलगाम हल्ल्यावरुन गृहमंत्रालयावर जोरदार टीका केली आहे. यावेळी संजय राउत यांनी असेही म्हटले की, पंतप्रधानांनी शाहांचा राजीनामा घ्यावा.

Sanjay Raut on Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच पाकिस्तानला याचे सडेतोड उत्तर देण्यासाठी तयारी केली जात आहे. यासाठी भारताने फ्रान्ससोबत राफेल फाइटर जेटसाठी करार केला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की हल्ल्याचे उत्तर आपले भारतीय सैन्य देईल. पण कारवाई गृहमंत्रालयावर करावी. याशिवाय पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्याच्या पहिल्या 24 तासात उत्तर द्यायला हवे होते असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

संजय राऊत यांनी पहलगाम हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी म्हटले की, "सैन्य काश्मीरमध्ये आहे तरीही पहलगाम येथे हल्ला झाला. सैन्यावर जबाबदारी सोडून तुम्ही तुमच्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. जर हल्ल्याचा बदला आणि श्रद्धांजली द्यायची असेल तर गृहमंत्रालयावर कारवाई करावी. इंटेलिजेंस का विफल ठरली आणि तुम्ही काय करत होता? जर सरकार एखाद्या दुसऱ्याची असती आणि आमच्यापैकी एखादा गृहमंत्री असता तर भाजपाने संपूर्ण देशात तांडव केला असता."

सैन्यामुळेच काश्मीर भारताचा भाग

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पुढे म्हटले की, सैन्याला फ्री हँड देणे मोठी गोष्ट नाही. आम्ही कालच पाहिले आहे की, "फ्रांससोबत 60 हजार कोटींच्या राफेलची खरेदी करण्यात आली आहे. पीएम मोदी यांनी सैन्याला फ्री हँड्स द्यावेत. सैन्य आहे यामुळेच काश्मीर भारतात आहे."

तुम्ही गृहमंत्र्यांवर कारवाई करा- संजय राऊत

संजय राऊत पत्रकार परिषदेत असेही म्हणाले की, "आम्हाला राजकरण करायचे नाही. पहलगाम हल्ल्यावर आम्ही सरकारचे समर्थन करत आहोत. पण सरकारने जो गुन्हा केलाय त्याचे आम्ही समर्थन करणार नाही. ज्यावेळी युद्ध होईल तेव्हा आम्ही समर्थन करू. जोपर्यंत पंतप्रधान गृहमंत्र्यांवर कारवाई करत नाही तोपर्यंत बदल्याची सुरुवात होणार नाही. बदला घ्यायचा असेल तर आपल्या घरातून सुरुवात करा. बदला सैन्य घेईल, ते तुम्ही सैन्यावर सोडा."