Sanjay Deshmukh on UBT Meeting : उद्धव ठाकरेंची आज खासदार संजय देशमुख यांच्या यवतमाळ मतदार संघात सभा होती. या सभेत उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांनी संजय देशमुखांवर टीका केली. यालाच आता संजय देशमुख यांनी प्रतिउत्तर दिले आहे. 

Sanjay Deshmukh on UBT Meeting : उद्धव ठाकरे उबाठामधून फुटलेल्या मतदार संघात सभा घेण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. आज उद्धव ठाकरे यांची पहिली सभा यवतमाळ मतदारसंघात होती. या सभेला संबोधित करताना संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी फुटीर मतदारांवर सडकून टीका केली. याशिवाय, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. राम मंदिर चोरी प्रकरणाच्या मुद्द्यावरुनही भाष्य केले. याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया देत उत्तर दिले आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

संजय देशमुखांची प्रतिक्रिया 

उबाठाच्या सभेमध्ये करण्यात आलेल्या टीका-टिप्पणीला काही अर्थ नाही. आम्ही सहाजणांनी जो निर्णय घेतला तो विकासाच्या मुद्द्यावर घेतला. लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. त्या पद्धतीनेच आम्ही निर्णय घेतला. लोकांना विश्वास घेऊन सर्वकाही केले आहे. हा निर्णय एकामताने किंवा माझ्या मताने घेतलेला नाही. आजची यवतमाळमधील सभेवरुनच कळले असेल की, जनतेमधून उद्धव ठाकरेंना किती प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय वणी मतदारसंघातील सर्वजण सभेसाठी उपस्थितीत होते. ही लोक यवतमाळ लोकसभा क्षेत्रातील नव्हते.

संजय राऊतांवरही भाष्य

संजय राऊतांनी केलेल्या टीकांवर आम्ही लक्ष देणार नाही असे संजय देशमुख म्हणाले. याशिवाय कारण आम्हाला ज्या लोकांनी निवडून दिले त्यांचा विचार करायचा आहे. संजय राऊत सर्वांच्याच बाबतीत टीका करतात. वायफळ बोलत असतात. ते कशापद्धतीने बोलले पाहिजे हे संजय राऊतांना कळले पाहिजे. त्यांच्याच बोलण्यामुळे उबाठा पक्ष कमजोर होत चालला आहे.

उद्धव ठाकरेंची उद्या हिंगोलीत सभा 

यवतमाळमधील कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर उद्धव ठाकरे उद्या (28 जून) हिंगोलीत दुसरी सभा घेणार आहेत. खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या मतदारसंघात सभा आयोजित करणार आहे. यावेळी मदतरासंघातील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या यवतमाळमधील सभेनंतर उद्या हिंगोलीत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.