Uddhav Thackeray at Yavatmal : उद्धव ठाकरे आज यवतमाळ दौऱ्यावर आहेत. येथे उद्धव ठाकरेंची पहिली सभा आयोजित करण्यात आली. या सभेत उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदार संजय देशमुखांसह अन्य फुटलेल्या खासदारांवर टीकास्र सोडले.

Uddhav Thackeray at Yavatmal : उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमध्ये पहिली सभा आयोजित केलेली होती. फुटीर खासदार संजय देशमुखांच्या मतदारसंघात ही सभा बोलावली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उबाठामधून फुटलेल्या खासदारांसह, एकनाथ शिंदे, शिंदे शिवसेना आणि भाजपावर जोरदार घणाघात केला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी सभेला सुरुवात करताना प्रथम जनतेची माफी मागितली. माझी चूक झाली असे म्हटले. यानंतर उद्धव ठाकरेंनी म्हटले की, माझ्या सांगण्यावरुन बुजगावणं दिलं, त्याला तुम्ही निवडून दिलं. यासाठी रक्ताच पाणीही केलं. गद्दार हा गद्दारांच्या कळपात गेला. यामुळे तुम्ही निवडून दिलेल्या गद्दाराला जाब विचारा. आईची शपथ घेऊन गद्दारी केली. काय वाटलं असे त्या आईला? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी सभेवेळी उपस्थितीत केला. एवढेच नव्हे खासदार संजय देशमुख यांची जुन्ही ऑडिओ क्लिपही ऐकवली. सडलेली पानं गेली, आता नवीन कोंब उगवणार असेही उद्धव ठाकरेंनी सभेवेळी म्हटले.

एकनाथ शिंदेंवर टीका

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख गद्दारांचा शिरोमणी असा केला. मशालीवर निवडून आलेले 9 खासदार शिंदेंना का फोडावे लागले असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला. आमदाराला 50 कोटी दिले, खासदाराला किती पैसे दिले असे म्हणत शिंदेंवर टीकास्र सोडले. खासदारांनी गद्दारी करुन विश्वाला काळं फासलं. हिंदूंच्या भावनेशी गद्दारी करणारा हा पक्ष. गद्दारांच रक्त हे गद्दारीने नासून टाकलेले आहे. यामुळे ही गद्दारी शिवसेनेसोबत नव्हे तर हिंदुत्वाशी केलेली आहे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

भाजपावरही निशाणा

मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले असे चिडवले जात होते. पण मोदींच्या समोर त्यांची लाट असताना शिवरायांच्या महाराष्ट्राने मोदींच्या भाजपाला आडवा केले. यावेळी शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे 31 खासदार बसवले. कुठे गेली ती मोदींची लाट? असा प्रश्न उपस्थितीत केला. याशिवाय विकासनिधीच्या नावे आता बोंबलत आहेत. विकासनिधी हा भाजपाच्या मालकीचा नाही. तसेच राम मंदिराच्या दानपेटीतील पैसे चोरले जातायत यावरही प्रश्न विचारला. हिंदूंच्या भावनेशी गद्दारी करणारा हा पक्ष. यामुळे आम्हाला भाजपमुक्त राम हवाय असे विधान उद्धव ठाकरेंनी केले.

Scroll to load tweet…