सांगली जिल्ह्यातील तासगावमधील शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा पोलिसांकडून प्रयत्न, घटनास्थळी शेतकरी झाले संतप्त

| Published : May 26 2024, 02:41 PM IST

तासगाव पाणी प्रश्न पोलीस आणि शेतकरी
सांगली जिल्ह्यातील तासगावमधील शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा पोलिसांकडून प्रयत्न, घटनास्थळी शेतकरी झाले संतप्त
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील आंदोलन दडपण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असून यामुळे घटनास्थळावरील शेतकरी संतप्त झाले आहेत. येथे पोलिसांनी काही शेतकऱ्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला आहे. 

सामान्य लोकांवर पोलीस एकाबाजूला अत्याचार करत असताना श्रीमंत लोकांच्या मुलांना मात्र दुसरा न्याय देताना ते दिसून येत आहेत. पुण्यामध्ये कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातामध्ये दोषी असलेल्या अल्पवयीन आरोपीला दहा तासांमध्ये काही अटीवर जामीन देण्यात आला मात्र सामान्य लोकांना वेगळा न्याय देत असताना सरकार मात्र अन्याय करत असल्याची भावना निर्माण होत आहे.

आंदोलनकर्त्यांवर केला लाठीमार - 
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. या ठिकाणी झालेल्या लाठीमारामुळे शेतकरी संतप्त झाल्याचे व्हिडिओमधून दिसून आले आहे. व्हिडिओमध्ये पोलीस एका शेतकऱ्याला धरून पोलीस व्हॅनमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये त्या व्यक्तीची कॉलर धरली असून पुढे तिला बळजबरीने पोलीस व्हॅनमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. 

तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी हा शेतीच्या पाण्यासाठी आंदोलन करत आहे. मात्र पोलिसांनी हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पोलीस प्रशासन बळाचा वापर करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणचे शेतकरी संतप्त झाल्याचे व्हिडिओमधून दिसून येत आहे. याबद्दलचे ट्विट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे. 
आणखी वाचा - 
कर्नाटकातील उडपीमध्ये दोन गटांत झाला राडा, एका व्यक्तीला स्विफ्टने उडवल्यामुळे त्याचा जागीच झाला मृत्यू?
अमेरिकेत एका वर्षाच्या बाळाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, नक्की काय आहे प्रकरण वाचा सविस्तर