सार
अमेरिकेत एका वर्षाच्या बाळाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरंतर, आईच्या प्रियकराने बाळावर हल्ला केल्यानंतर त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर...
Crime News : अमेरिकेतील ओहियो येथील एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॅमिल्टन काउंटी प्रॉसिक्युटिंग ॲटर्नी मेलिसा पॉवर्स यांनी सांगितले, करीम कीता (Kareem Keita) याला 5 मे ला मृत घोषित करण्यात आले होते. खरंतर, एक वर्षाचे बाळ घरी असताना त्याच्या शरिराची कोणतीच हालचाल होत नव्हती.
मिस पॉवर्स यांच्या माहितीनुसार, 23 वर्षीय एडवर्ड मरीला करीमच्या मृत्यूच्या संदर्भात ताब्यात घेण्यात आले होते आणि त्यानंतर त्याच्यावर हत्येसह अनेक गुन्ह्यांच्या आरोपांचा ठपका ठेवण्यात आला होता. 1 मे रोजी बाळाची हत्या करण्यात आल्याचा दावाही केला जातोय. या प्रकरणात अधिक तपास केला असता, करीमचा गंभीर जखमा झाल्या होत्या. यामुळेच बाळाला हृदयविकाराचा झटका आला. सिनसिनाटी येथील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी म्हटले की, एका वर्षाच्या बाळावर हिंसक हल्ला करण्यात आल्याने त्याची प्रकृती नाजूक झाली. अशातच त्याचा मृत्यूही झाला.
तीन महिन्यांपासून आरोपीसोबत होती रिलेशनशिपमध्ये
मृत करीमची आई अमिनाता कीताचे आरोपीसोबत गेल्या तीन महिन्यांपासून रिलेशनशिप सुरू होते. 1 मे रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मरी याने करीमचा खोलीत घेऊन जात बेडवर ठेवले. दोघेही घरात खेळत होते. मुरीने खुप वेळ करीमसोबत खोलीत घालवल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. पण करीमला नक्की जखमा कशा झाल्या याबद्दल मुरीला अधिक स्पष्टपणे सांगता आले नाही.
आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल
ऑनलाइन कोर्टाच्या कागदपत्रांनुसार मरीवर (Murray) वर दोन गुन्हे दाखल करण्यात आहेत. एक गुन्हा प्राणघातक हल्ला आणि दुसरा गुन्हा मुलाचा जीव धोक्यात आणल्याचा गुन्हा आरोपीच्या विरोधात दाखल केलाय.
आणखी वाचा :
पोलीस निरीक्षकाकडून तरुणीचा विनयभंग, नंदनवन पोलिसांत गुन्हा दाखल
'मुंबईत स्पेशल 26', म्हैसूर कॅफेच्या मालकाला 25 लाखांचा लावला चुना