पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन तरुणींना नेऊन अश्लील प्रश्न विचारत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असून आमदार रोहित पवार यांनी तरुणींची भेट घेऊन पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे.

पुणे: कोथरूड पोलीस ठाण्यात नेऊन मारहाण केल्याचा आरोप तीन तरुणींनी केला आहे. तुम्ही महार मांगाच्या मुली आहेत का, किती मुलांसोबत झोपला आहे की लेस्बियन मुली आहात, असे प्रश्न विचारून मुलींचे मोबाईल घेऊन त्यांना शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.

दिवसभर आयुक्तालयासमोर केलं आंदोलन 

या मुलींनी पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन केलं आहे. रात्री आमदार रोहित पवार यांनी त्यांची भेट घेतली आहे. तरुणीचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर रोहित पवार यांच्यासह पोलीस आयुक्तालयात गेले होते, त्यांनी यावेळी पोलिसांवर कारवाईची मागणी केली होती. रोहित पवारांसह काही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

तीन तरुणींच्या घरी पोलीस गेले होते 

पुण्यात नोकरी करत असलेल्या आणि कोथरूडमध्ये राहत असलेल्या तीन तरुणींच्या घरी पोलीस गेले होते. त्यांचे कपडे तपासून त्यामध्ये काही आहे का हे पोलिसांनी तपासून पहिले होते. त्यांच्या मोबाईलमधील चॅट्स पहिल्या आणि नंतर त्यांना जातीवरून सुनावले होते. तुम्ही किती मुलांसोबत झोपल्या आहात, तुम्ही लेस्बियन आहेत का असे प्रश्न पोलिसांनी यावेळी या तरुणींनी विचारले होते.

रोहित पवार तरुणींसोबत आयुक्तालयात पोहचले 

यावेळी आमदार रोहित पवार यांनी तरुणींचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांच्यासोबत आयुक्तालयात जाऊन पोहचले. त्यांनी यावेळी कारवाई केली नाही तर आम्ही आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा दिला होता. पोलिसांवर कारवाई का केली जात नाही यावरून रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

Scroll to load tweet…

रोहित पवार काय म्हणाले? - 

सत्तेची मस्ती चढल्याने निर्ढावलेल्या राज्यकर्त्यांच्या दबावात येऊन काम करणाऱ्या सरकारी यंत्रणाही निर्ढावतात. अशा यंत्रणांचा सर्वाधिक फटका हा सर्वसामन्यांना आणि दीन-दुबळ्यांना बसतो. तसाच काहीसा प्रकार तीन युवतींच्या बाबतीत घडला. त्यांना चक्क कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये अत्यंत खालच्या पातळीवर जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.