सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर ३ सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातून पहिली खेळी केली असून समरजीत घाटगेंसारखा मोठा मोहरा आपल्या पक्षात घेतला आहे. विधानसभेसाठी रणशिंग फुंकलेल्या समरजीत घाटगेंनी कागलच्या गैबी चौकातील कार्यक्रमात शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी तालुक्यातून हजारोंच्या संख्येने तरुणांनी हजेरी लावल्याचे दिसून आले. गैबी चौक इतका खचाखच भरला होता की पाय ठेवायलाही जागा नव्हती.

२. सिंधुदुर्ग किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडल्याप्रकरणी मूर्तिकार जयदीप आपटे याच्या घराच्या बाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे

३. आज मराठवाडामध्ये मुसळधार पाऊस झाला असून ८  जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे.

४. यवतमाळ जिल्ह्यात पाऊस वाढला असून येथे एनडीआरएफ टीम दाखल झाली आहे. 

५. कोकणातील आंबा घाटात वाहनांच्या रांगा लागल्या असून त्यामुळे वाहनचालक त्रासले आहेत.