सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 23 ऑगस्टच्या प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटीलला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्याला मालवणमधील दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून जयदीप आपटे आणि चेतन पाटील हे दोघेही फरार होते. मात्र, कोल्हापूर पोलिसांना चेतन पाटीलच्या मुसक्या आवळण्यात यश आले.

२. राजस्थानी मल्टीस्टेट घोटाळ्यासंदर्भात बीड आर्थिक गुन्हा शाखेने मोठी कारवाई केली आहे. राज्यस्थानी मल्टीस्टेटचा संचालक अभिषेक बियाणीला पुण्यातून बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज पहाटे ताब्यात घेतले आहे. अनेक तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. त्याला आता बीडला घेऊन येणार असून राजस्थानी मल्टीस्टेट च्या प्रकरणातील तपासला आता वेग येणार आहे.

३. आपल्याला विधानसभा निवडणुकीसाठी ६०  जागांवर काम करायचं असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केला आहे. 

४. शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी नवीन समितीची स्थापना करण्यात आली असून यामध्ये सरकारी अधिकारी मनीषा म्हैसकर यांचा समावेश करण्यात आला आहे. 

५. काँग्रेसचे देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी प्रवेश करण्याच्या आधी आमदार पदाचा राजीनामा दिला होता. 

६. मनोज जरांगे हे १  सप्टेंबर रोजी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडलेल्या ठिकाणी भेट देणार आहेत.