Rajya Sabha Elections 2024 : राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिक्कामोर्तब, आज भरणार उमेदवारी अर्ज

| Published : Jun 13 2024, 09:03 AM IST

Ajit Pawar Sunetra Pawar
Rajya Sabha Elections 2024 : राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिक्कामोर्तब, आज भरणार उमेदवारी अर्ज
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. अशातच सुनेत्रा पवार 13 जूनला राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Rajya Sabha Elections 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना बुधवारी (12 जून) राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्य 25 जूनला राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठीच सुनेत्रा पवार आज (13 जून) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवार यांनी मुंबईत आपल्या निवासस्थानी पक्षातील मंत्र्यांसोबत बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

राज्यसभेसाठी पुन्हा एकदा संधी
लोकसभा निवडणुकीसाठी बारामती (Baramati) येथून सुनेत्रा पवारांच्या विरोधात सुप्रिया सुळे (Spuriya Sule) उभ्या होत्या. यामध्ये सुनेत्रा पवारांचा पराभव झाला होता. अशातच सुनेत्रा पवारांचे पुन्हा एकदा राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एकमताने सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यावर निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ऑक्टोंबर महिन्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सुनेत्रा पवारांना राज्यसभेची निवडणुक लढवण्याची संधी पक्षाकडून देण्यात आली आहे.

पक्षाने सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यामागील कारण म्हणजे, विधानसभा निवडणुकीआधी बारामती येथून शरद पवार आणि त्यांच्या पक्षाती खासदार सुप्रिया सुळे यांना टक्कर देण्याच्या उद्देशाचे उचलले आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवार बारामती येथून लढण्याची शक्यता आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले?
बुधवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव ठेवत मंत्र्यांना याबद्दल विचार करण्यास सांगितले होते. कृषी मंत्री धनजंय मुंडे यांनी प्रफुल्ल पटेलांच्या प्रस्तावाचे समर्थन केले. दरम्यान, एनसीपीचे वरिष्ठ मंत्री छगन भुजबळ राज्यसभेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर कोणताही आक्षेप नाही असेही छगन भुजबळ यांनी म्हटले. पण सुनेत्रा पवारांच्या नावाची सिफारिश करण्याआधी संसदीय बोर्डाची बैठक का बोलावली नाही असा सवालही भुजबळांनी उपस्थितीत केला आहे.

आणखी वाचा : 

Rajya Sabha Seat : राज्यसभेच्या 10 जागा रिक्त, राज्यातील 2 जागांचा समावेश; कोणाला मिळणार संधी?

Manoj Jarange Patil Hunger Strike : तब्येत ढासळली तरी मनोज जरांगे पाटील यांचा उपचार घेण्यास स्पष्ट नकार