Manoj Jarange Patil Hunger Strike : तब्येत ढासळली तरी मनोज जरांगे पाटील यांचा उपचार घेण्यास स्पष्ट नकार

| Published : Jun 11 2024, 11:06 AM IST / Updated: Jun 11 2024, 11:11 AM IST

Manoj Jarange Patil Hunger Strike

सार

Manoj Jarange Patil Hunger Strike : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांची तब्येत खालावत असून त्यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

Manoj Jarange Patil Hunger Strike : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. आता त्यांची तब्येत ढासळत चालली आहे. त्यांचा बिपी खालवत चालला असून डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना उपचाराचा सल्ला दिला आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कठोर उपोषण सुरू आहे. उगाचच मराठ्यांना लाडीगोडी लावत असतील गोड बोलून काटा काढायचं काम सुरू असल्याचा अंदाज मला दिसत आहे. एकीकडे तातडीने मार्ग काढू म्हणायचं इकडं कठोर उपोषण सुरू आहे. तातडीने मार्ग काढू म्हणायचं आणि पाच पाच दिवस होऊ द्यायचे. हा डाव सुद्धा असू शकतो त्यांना मराठ्यांची माया असती तर चार चार दिवस उगच त्यांनी दिले नसते. मी कोणतेही उपचार घेणार नाही.

थोडं थांबा कळेल तुम्हाला

मंत्री छगन भुजबळ यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन सोहळ्यात म्हटले की, मराठा समाजाला जे आरक्षण दिले आहे ते टिकणारे आहे. विनाकारण वाद वाढवू नये. मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही, आणि तसे समजू पण नका. यावर मनोज जरांगे म्हणाले की, तू नको सांगू मला, माझं मला कळतं. थोडं थांबा कळेल तुम्हाला असा इशारा त्यांनी दिला आहे.

आणखी वाचा :

Rain Alert : येत्या चार दिवसात मुसळधार पाऊस, मुंबई, ठाण्यासह रायगडमध्ये यलो अलर्ट