US Israel Iran Conflict : अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील प्रवाशांना परत आणण्यासाठी राज्य सरकार सक्रिय झाले आहे.

US Israel Iran Conflict : अमेरिका-इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता जागतिक पातळीवर उमटू लागले आहेत. या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये, विशेषतः दुबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे महाराष्ट्रातील अनेक प्रवासी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.

काही प्रवासी परतले, अनेक अजूनही अडकले

काल रात्री काही प्रवासी सुरक्षितपणे भारतात परतले असले, तरी अजूनही अनेक नागरिक दुबईसह आखाती देशांमध्ये अडकले आहेत. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विमानसेवांवर परिणाम झाला असून प्रवाशांची गैरसोय होत आहे.

 मुख्यमंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विविध यंत्रणांशी सातत्याने संवाद साधत असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच समन्वयाची जबाबदारी राज्याचे मंत्री Girish Mahajan यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. केंद्र सरकारही राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करत असल्याची माहिती आहे.

व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जारी

दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या समन्वयाने महाराष्ट्र सरकारने अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जारी केला आहे. मदतीची आवश्यकता असलेल्या प्रवाशांनी +97150 365 4357 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Scroll to load tweet…

सरकारचे आवाहन

अडकलेल्या नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत क्रमांकावर संपर्क साधावा आणि आवश्यक माहिती द्यावी, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. परिस्थिती सामान्य करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.