MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Heatwave Alert: सावधान! महाराष्ट्रात सूर्य ओकणार आग; पुढील ४ दिवस महत्त्वाचे, 'या' जिल्ह्यांना हीटवेव्हचा इशारा!

Maharashtra Heatwave Alert: सावधान! महाराष्ट्रात सूर्य ओकणार आग; पुढील ४ दिवस महत्त्वाचे, 'या' जिल्ह्यांना हीटवेव्हचा इशारा!

Maharashtra Heatwave Alert: हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील चार दिवसांत तापमान २ ते ३ अंशांनी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भात पारा ४१ अंशांपर्यंत पोहोचू शकतो, तर अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 03 2026, 09:31 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
सावधान! महाराष्ट्रात सूर्य ओकणार आग
Image Credit : Asianet News

सावधान! महाराष्ट्रात सूर्य ओकणार आग

मुंबई : राज्यावर आता उन्हाळ्याचे चटके अधिक तीव्र होणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील चार दिवसांत राज्याच्या तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यंदा मार्चच्या सुरुवातीलाच काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट (Heatwave) येण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
तुमच्या विभागाची स्थिती काय?
Image Credit : Social Media

तुमच्या विभागाची स्थिती काय?

राज्यात ४ मार्चपासून हवामान कोरडे राहून उन्हाचा तडाखा वाढणार आहे. विभागांनुसार तापमानाचा अंदाज खालीलप्रमाणे आहे. 

Related Articles

Related image1
रेशन कार्डधारकांसाठी गुड न्यूज! १ एप्रिलपासून 'हा' नवा नियम लागू; आता देशात कुठेही मिळणार हक्काचं धान्य
Related image2
Weather Alert: सावधान! कोकणात उन्हाचा कडाका वाढणार; उद्या ४ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट', तुमच्या भागातील तापमान किती?
38
कोकण (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड)
Image Credit : our own

कोकण (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड)

या भागाला उष्णतेचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. तापमान ३७ अंशांच्या पार जाऊ शकते. आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवेल. 

48
विदर्भ (नागपूर, चंद्रपूर, अकोला)
Image Credit : social media

विदर्भ (नागपूर, चंद्रपूर, अकोला)

विदर्भात पारा सर्वाधिक म्हणजे ४१ अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. येथे उष्णतेच्या लाटेचा प्रभाव सर्वाधिक असेल. 

58
मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड)
Image Credit : Freepik

मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड)

या भागात तापमान ३६ ते ४० अंशांच्या दरम्यान राहील. हवामान पूर्णपणे कोरडे असेल. 

68
उत्तर महाराष्ट्र (नाशिक, जळगाव)
Image Credit : Asianet News

उत्तर महाराष्ट्र (नाशिक, जळगाव)

कोरड्या वाऱ्यांमुळे उष्णता वाढून पारा ३९ अंशांपर्यंत पोहोचू शकतो. 

78
पश्चिम महाराष्ट्र (पुणे, सोलापूर, कोल्हापूर)
Image Credit : Asianet News

पश्चिम महाराष्ट्र (पुणे, सोलापूर, कोल्हापूर)

रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याने रात्रीही उकाडा जाणवेल. 

88
उष्माघातापासून बचावासाठी 'हे' नक्की करा
Image Credit : ANI

उष्माघातापासून बचावासाठी 'हे' नक्की करा

वाढत्या तापमानामुळे डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका संभवतो. स्वतःची काळजी घेण्यासाठी खालील उपाय करा.

१. भरपूर पाणी प्या: तहान नसली तरीही ठराविक अंतराने पाणी पीत राहा.

२. वेळेचे नियोजन: दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळा.

३. पोशाख: बाहेर जाताना सुती आणि फिकट रंगाचे कपडे वापरा, डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवा.

४. शेतकरी व मजूर: कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा उरकून घेण्याचा प्रयत्न करा.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
विदर्भातील बातम्या
कोल्हापूर बातम्या
पुण्याच्या बातम्या
नाशिक बातम्या
छ. संभाजीनगर बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Nashik Kumbh Mela: रशिया-युक्रेन युद्ध विसरून दोन मित्र नाशिकच्या कुंभमेळ्यात!
Recommended image2
Pune Crime : लंडनमध्ये शिकणारी पुण्यात मृतावस्थेत; ऑनलाईन फूड ऑर्डरवरून उलगडलं रहस्य, काय घडलं?
Recommended image3
मतदारांसाठी महत्त्वाची बातमी! मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी मुदतवाढ; मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन
Recommended image4
FDA Officials Suspended : पुणे आणि भिवंडीत अनधिकृत छापे, FDA च्या ४ अधिकाऱ्यांचे निलंबन
Recommended image5
Maharashtra Police : दारुड्या नवऱ्याला मागे बसवलं, स्वतः गाडी चालवत पोलिसांनी गरोदर महिलेला रुग्णालयात पोहोचवलं
Related Stories
Recommended image1
रेशन कार्डधारकांसाठी गुड न्यूज! १ एप्रिलपासून 'हा' नवा नियम लागू; आता देशात कुठेही मिळणार हक्काचं धान्य
Recommended image2
Weather Alert: सावधान! कोकणात उन्हाचा कडाका वाढणार; उद्या ४ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट', तुमच्या भागातील तापमान किती?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved