सेल्फीच्या नादात जीव धोक्यात!, 100 फूट दरीत कोसळली तरुणी; पाहा घटनेचा थरार

| Published : Aug 04 2024, 12:46 PM IST

mobile selfie accident in satara
सेल्फीच्या नादात जीव धोक्यात!, 100 फूट दरीत कोसळली तरुणी; पाहा घटनेचा थरार
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पुण्यातील एका युवतीने डोंगराच्या किनाऱ्यावर सेल्फी काढण्याचे धाडस केले अन् ती शंभर फूट खोल दरीत कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना साताऱ्यातील बोरने घाटात घडली.

 

सेल्फी प्रकाराचा नाद युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात आहे. मग ही सेल्फी काढण्यासाठी काही जण वेगवेगळ्या प्रकारचे धाडस करतात. कधी पाण्याच्या प्रवाहाजवळ सेल्फी काढतात, कधी डोंगर दऱ्यांमध्ये सेल्फी काढली जाते. हा प्रकार जीवावर बेतणाराही ठरला असल्याचा आतापर्यंत अनेक घटना समोर असतानाही साताऱ्यातील बोरने घाटात आणखी एक घटना घडली आहे. पुण्यातील एका युवतीने डोंगराच्या किनाऱ्यावर सेल्फी काढण्याचे धाडस केले अन् ती शंभर फूट खोल दरीत कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना साताऱ्यातील बोरने घाटात घडली आहे. नसरीन अमीर कुरेशी असे या तरुणीचे नाव आहे.

नेमकं कसा घडला संपूर्ण प्रकार

पुण्यातील वारजे येथील नसरीन अमीर कुरेशी (वय २९) काही जण साताऱ्यातील संगमनगरमध्ये कारने आले होते. हे सर्वजणांनी ठोसेघर येथे भटकंती केली. परंतु ठोसेघर धबधबा बंद होता. त्यामुळे बोरणे घाटात आल्यावर सर्वजण गाडीतून उतरुन फोटोसेशन करु लागले. नसरीन सेल्फी घेत असताना अचानक तिचा तोल गेला. त्यानंतर ती शंभर फूट खोल दरीत पडली. एका झाडाला ती अडकली. यामुळे तिचा जीव वाचला.

युवतीला केले रुग्णालयात दाखल

नसरीन कुरेशीसोबत आलेल्या मुलांनी ही माहिती सातारा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या युवकांना बोलवले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने घाटात मदतकार्य सुरू केले. होमगार्ड अभिजित मांडवे दरीत उतरला. त्याने त्या तरुणीला दोरीच्या साह्याने सेफ्टी बेल्टने बांधून बाहेर काढले. या घटनेत नसरीन कुरेशी गंभीर जखमी झाली आहे. तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

सेल्फीच्या नाद बेतोय जीवावर

साताऱ्यातील बोरणे घाट किंवा कास रस्त्यावर अनेक पर्यटक पर्यटनासाठी येतात. ते रस्त्यावर गाड्या थांबवून सेल्फी घेतात. एकमेकांचे फोटो काढतात. त्यावेळी अगदी घाटाच्या टोकावर जातात. यावेळी दुर्घटनाही होतात. यामुळे पर्यटकांवर कारवाई करण्याची गरज आहे.

आणखी वाचा :

रील्सच्या नादात जीव धोक्यात!

दिल्लीत UPSC करणाऱ्या अंजलीने का केली आत्महत्या?, कारण घ्या जाणून

टोमॅटो आता 70-80 रुपये नाही तर 50 रुपये किलोने खरेदी करा, कुठून ते जाणून घ्या?