CRIME NEWS: पुण्यातील डेक्कन परिसरातील एका हॉटेलमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सुरज मराठे यांनी आत्महत्या केली आहे. २६ वर्षीय सुरज हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर होते आणि त्यांच्या खोलीत एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. 

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन जिमखाना परिसरातील एका हॉटेलमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून एक पोलीस अनेक दिवसांपासून रजेवर होता. त्यांच्या मोबाईलचा तपास केल्यावर मोबाईल एका बंद खोलीत असलेला आढळून आला होता.

२ वर्षापूर्वीच पोलिस दलात झालं भरती 

तासगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सुरज मराठे यांनी विष घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. २६ वर्षांचे सुरज हे आळंदीचे रहिवासी असून २ वर्षांपूर्वीच ते पोलीस दलात दाखल झाले होते. ते गेल्या ८ ते १० दिवसांपासून रजेवर गेले होते.

बुधवारी सकाळी आढळला मृतदेह 

बुधवारी सकाळी पुण्याच्या डेक्कन परिसरातील आपटे रोडवर एका हॉटेलवर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. हॉटेलचा दरवाजा उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेचा कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

सुसाईड नोट सापडली 

सुरज मराठे यांचे कुटुंबीय पुणे जिल्ह्यातील देहू येथे राहत असतात. अत्यंत कमी वयात पोलीस दलात त्यांची भरती झाले होते. त्यांनी आयुष्य संपवल्यामुळं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी सुसाईड नोटचा उल्लेख केला आहे.