Palghar Train Accident : वसईतील रेल्वे स्थानकातील सिग्नलिंग पॉइंटची दुरुस्ती करताना तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना लोकलची धडक, मृत्यू

| Published : Jan 23 2024, 03:16 PM IST / Updated: Jan 23 2024, 03:22 PM IST

Local trains will start service from February 1, was closed for 9 months
Palghar Train Accident : वसईतील रेल्वे स्थानकातील सिग्नलिंग पॉइंटची दुरुस्ती करताना तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना लोकलची धडक, मृत्यू
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पालघर जिल्ह्यात लोकल ट्रेनची धडक बसल्याने तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. वसई रेल्वे स्थानकातील सिग्नलिंग पॉइंटच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Palghar Train Accident : पालघर जिल्ह्यात लोकल ट्रेनच्या धडकेत पश्चिम रेल्वेच्या तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सर्व कर्मचारी पालघर जिल्ह्यातील वसई (Vasai) रेल्वे स्थानकात सिग्नलिंग पॉइंटच्या (Signalling Point Work) दुरुस्तीचे काम करत होते.

शासकीय रेल्वे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने या घटनेबद्दल अधिक माहिती दिली आहे. जीआरपीच्या (GRP) अधिकाऱ्यांनी म्हटले की, ही घटना सोमवारी (22 जानेवारी) रात्री 8 वाजून 55 मिनिटांनी वसई रोड आणि नायगांव रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. लोकल ट्रेन चर्चगेटच्या (Churchgate) दिशेने जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

सिग्नलिंग पॉइंट दुरुस्ती करताना घडला अपघात
मृत व्यक्तींची ओळख पटली असून त्यांची नावे मुख्य सिग्नलिंग निरीक्षक वासु मिस्रा (भाईंदर), इलेक्ट्रिकल सिग्नलिंग मेंटेनर सोमनाथ उत्तम लाम्बुत्रे (वसई रोड) आणि हेल्पर सचिन वानखेडे अशी आहेत. जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देत म्हटले की, सर्व कर्मचारी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील सिग्नलिंग विभागातील होते. हे सर्वजण सिग्नलिंग पॉइंटची दुरुस्ती करण्यासाठी आले होते, जो सोमवारी बिघडला गेला होता.

मृतांच्या परिवाराला 55 हजारांची आर्थिक मदत
पश्चिम रेल्वेकडून दुर्घटनेसंबंधित तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी मृतांच्या परिवाराला तत्काळ 55 हजार रूपयांची आर्थिक मदत केली आहे.

आणखी वाचा : 

Dombivli Fire : डोंबिवलीतील खोणी पलावामध्ये एस्ट्रोला टॉवरला भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

सोशल मीडियावरील पोस्ट Like करणे इंजिनिअर तरुणाला पडले महागात, गमावले 20 लाख रूपये

Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील केमिकल फॅक्टरीला भीषण आग

Top Stories