सार

नवी मुंबई येथील एका केमिकल फॅक्टरीला गुरुवारी (4 जानेवारी) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे.

Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये असलेल्या एका फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घडना घडली आहे. आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

रिपोर्ट्सनुसार, आग आज सकाळी लागल्याचे सांगण्यात येत आहे. पावणे एमआयडीसीमध्ये (Pawane MIDC) असलेल्या एका केमिकल फॅक्टरीला आग लागली. घटनास्थळी अग्निशनम दलाच्या काही गाड्या दाखल झाल्या आहेत. 

आग ऐवढी भीषण होती की, संपूर्ण परिसरात आगीच्या धुराचे लोट पसरले जात आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशनम दलाकडून प्रयत्न केले जात आहेत. अद्याप आग कशामुळे लागली हे समोर आलेले नाही.

औरंगाबाद येथील फॅक्ट्रीला आग
या घटनेआधी वर्षाच्या अखेरीस (31 डिसेंबर, 2023) औरंगाबाद (Aurangabad) येथील एका फॅक्टरीला आग लागल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला होता. वाळूज एमआयडीसी (MIDC Waluj) परिसरात असणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली होती.

आग लागल्याची  माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची अधिक माहिती देत सांगितले होते की, फॅक्टरीला आग रात्री 2 वाजून 15 मिनिटांनी लागली होती.

आणखी वाचा: 

Aurangabad Fire : औरंगाबाद येथील फॅक्टरीला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू

Pimpri Chinchwad Fire : पिंपरी-चिंचवडमधील मेणबत्तीच्या कारखान्याला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू

अभिनेते राकेश बेदी यांची ऑनलाइन फसवणूक, सैन्यातील अधिकारी असल्याचे सांगत घातला 85 हजारांचा गंडा