अन्न आणि औषध प्रशासन विभागाने आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वात मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत ९० लाखांहून अधिक किमतीची पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने, विनापरवाना आयुर्वेदिक औषधे जप्त करण्यात आली. पुणे, नांदेड, बीड आणि सोलापूरमध्ये जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घटकांवर ही धडक कारवाई करण्यात आली.

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. या विभागाची जबाबदारी संभाळल्यापासून तुकाराम मुंडे हे चर्चेत आले. त्यांनी महाराष्ट्रात एक धडक मोहीम राबवली आहे. यावेळी त्यांनी मोहिमेत पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने, विनापरवाना आयुर्वेदिक औषधे आणि रुग्णालयाशी संलग्न असलेल्या फार्ममधील गंभीर बाबी समोर आणल्या आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

किती रुपयांचा साठा केला जप्त? 

यावेळी अन्न आणि प्रशासन विभागाने ९० लाख रुपयांच्या अधिक किंमतीचा साठा जप्त केला. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घटकांविरोधात कारवाई करण्याचे काम मुंडे यांनी सुरु केलं आहे. त्यांनी पुणे, नांदेड, बीड आणि सोलापूर येथे हि कामगिरी केली आहे.

पाकिस्तानातून आणली होती बेकायदा सौंदर्यप्रसाधने 

पाकिस्तानातून बेकायदा सौंदर्यप्रसाधने आणून ती विकली जात होती. तिथून आयात केलेली गोरी ब्रॅण्डसह विविध प्रकारची ३८हून अधिक प्रतिबंधित केली होती. या ब्रँडची सौंदर्यप्रसाधने विकली जात असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे आणि राष्ट्रीय सुरक्षिततेचा अँगल या प्रकरणाला आला आहे.

राज्यभरात अनेक ठिकाणी विनापरवाना आणि बनावट पद्धतीने तयार केली जाणारी आयुर्वेदिक औषधे जप्त करण्यात आली. सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहरातील रुग्णालयांमध्ये औषधांची तपासणी करण्यात आली. औषध विक्रीचे नियम न पाळणे, फार्मासिस्ट हजर नसणे आणि इतर गंभीर अनियमितता आढळल्यामुळं कडक कारवाई करण्यात आली.