अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचा साखरपुडा कायनात धार यांच्यासोबत २९ जुलै रोजी पुण्यात होणार आहे. हरियाणाच्या कायनात धार या अनेकदा पार्थ यांच्यासोबत दिसल्या होत्या आणि दोन्ही कुटुंबांचे जवळचे संबंध आहेत.

मुंबई: पवार कुटुंबात लवकरच परत एकदा सनई चौघडे वाजणार आहेत. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडला. आता दिवंगत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा पार पडणार आहे. २९ जुलै रोजी पुण्यात त्यांचा साखरपुडा होणार असल्याची माहिती समजली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पार्थ पवार यांच्या एन्ट्रीने वेधले होते लक्ष 

पार्थ पवार यांच्या एन्ट्रीने यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी पार्थ पवार यांच्यासोबत कायनात धार उपस्थित होती. यानंतर या दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. या दोघांच्या कुटुंबियांशी चांगले संबंध असल्याचं म्हटलं होतं. पार्थ आणि कायनात या दोघांनी मिळून महाकाल मंदिरात दर्शन घेतलं होतं. रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यात कायनात दिसली होती.

कायनात धार कोण? 

कायनात धार हि हरियाणाची असून सध्या दिल्लीत राहायला आहे. पवार कुटुंबियांशी धार कुटुंबाचे अतिशय जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. काही दिवसांपासून कायनात धार हि कायमच पार्थ पवार यांच्यासोबत दिसून आली होती. या दोघांचे महाकाल मंदिरातील फोटो प्रसिद्ध झाले होते. या दोघांबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगलेली दिसून आली.