राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्र सरकारवर निवडणूक पुढे ढकलल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, सरकारला जनतेने नापास केल्याचे दिसत असल्यानेच निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
कोलकत्ता येथे डॉटसोबत घडलेली घटना दुर्दैवी असून तिचा संपूर्ण देशात निषेध व्यक्त केला जात आहे. अनेक लोकांनी या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून त्या घटनेच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. मात्र, अनेक महिलांचे अर्ज फेटाळण्यात आलेत कारण त्यांचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नाही. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार लिंक असणे आवश्यक आहे.