स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मांसाहार न विक्री करण्याचा निर्णय कल्याण महानगरपालिकेने घेतल्याने राजकरण चांगलेच तापले आहे. यावरुन आता संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाराच्या रस्त्यावरील खड्ड्यांवरुन उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. याशिवाय आधी महामार्गावरील खड्डे भरा त्यानंतरच गणपती मंडळांकडून खोदकामाचे पैसे वसूल करा असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
मुंबई - आपल्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार यादीत नाव, तसेच मतदार ओळखपत्र असेल तर आपण भारतीय आहोत असे प्रत्येकाला वाटते. पण बॉम्बे हायकोर्टने हा दावा फेटाळून लावला आहे. ही कागदपत्रे असली तरी तुम्ही भारतीय ठरत नाहीत, असे सांगितले आहे.
घोडबंदरवरील गायमुख घाटातील रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. अशातच या मार्गावरील वाहतूक 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्टदरम्यान वळवण्यात आली आहे.
Maharashtra Rain Alert: पुढील २४ तासांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, तो ऑगस्टच्या शेवटच्या दोन आठवड्यांत येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने १५ हजार पोलिसांच्या भरतीला मान्यता दिली आहे. रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ, सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी VGF आणि कर्ज योजनांमधील जामीनदाराच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.
१९४७ मध्ये ब्रिटिश भारताचे विभाजन झाले तेव्हा Indian Independence Act नुसार भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळण्याची तारीख १५ ऑगस्ट १९४७ निश्चित करण्यात आली होती. अधिकृतरीत्या सत्ता हस्तांतरण १४ आणि १५ ऑगस्टच्या मध्यरात्री झाले.
मुंबई : श्रीकृष्ण जन्माष्टमी यंदा शनिवार, १६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरी होणार आहे. देशभरात या दिवशी भक्तिमय वातावरण, सांस्कृतिक सोहळे आणि विविध धार्मिक विधींची रेलचेल असते. या दिवशी महाराष्ट्रात शासकीय सुटी आहे की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
मुंबई / पुणे - ही चतुर्थी मंगळवारी आली, तर तिला अंगारक संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. या निमित्त घ्या मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक आणि पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचे दर्शन. फोटो मोबाईलवर होमपेजलाही सेट करु शकता. इतरांनाही पाठवू शकता.
Maharashtra