MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Rain Alert: पुढील 24 तास महत्त्वाचे! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Alert: पुढील 24 तास महत्त्वाचे! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Alert: पुढील २४ तासांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
| Updated : Aug 12 2025, 10:38 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
Image Credit : Getty

मुंबई : पुढील 24 तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 13 ते 19 ऑगस्ट या आठवड्यात राज्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील.

Gusty winds with speed reaching 30-40 Kmph very likely to occur at isolated places in the districts of Konkan, Madhya Maharashtra and Marathwada." 

तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/8lyqshx6M2

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 12, 2025

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
Image Credit : Social Media

मुंबई आणि कोकण

मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तास हवामान ढगाळ राहील आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. 13 ऑगस्टसाठी कोकणातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यलो अलर्ट: पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

Related Articles

Related image1
महाराष्ट्रात मोठी भरती! पोलीस दलात 15 हजार जागांसाठी मंत्रिमंडळाची मंजुरी, फडणवीस यांच्या नेतृत्त्वात घेतले 4 महत्वाचे निर्णय
Related image2
Ladki Bahin Yojana : ऑगस्टचा हप्ता कधी खात्यात येणार?, संभाव्य तारीख आणि महत्वाची माहिती समोर
35
Image Credit : AI Meta

पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यासाठीही यलो अलर्ट आहे, तर धुळे, नाशिक, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.

45
Image Credit : ANI

मराठवाडा आणि विदर्भ

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या सात जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात पावसाचा जोर जास्त राहणार आहे. चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

55
Image Credit : social media

ऑरेंज अलर्ट: यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली

पूर्व विदर्भातील नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ऑरेंज अलर्ट नसलेल्या उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

एकूणच, 13 ते 19 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण विदर्भात जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
बच्चू कडूंचा ठाकरेंवर पलटवार, उद्धव ठाकरेंनी फसवल्याचा केला दावा
Recommended image2
कोकण रेल्वेचा पावसाळ्यापूर्वी सेफ्टी मोड ऑन! प्रवाशांच्या सुरक्षेसाठी युद्धपातळीवर प्री-मान्सून कामे सुरू
Recommended image3
Maharashtra Board Exam : दहावी-बारावी परीक्षेत मोठा बदल; उत्तरपत्रिकांचे होणार ऑनस्क्रीन मूल्यांकन
Recommended image4
Rajya Sabha Election 2026 : राज्यसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर; सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी?
Recommended image5
Maharashtra Weather : उष्णतेने नागरिक त्रस्त; विदर्भात ऑरेंज अलर्ट तर पुणे-कोकणात पावसाची शक्यता
Related Stories
Recommended image1
महाराष्ट्रात मोठी भरती! पोलीस दलात 15 हजार जागांसाठी मंत्रिमंडळाची मंजुरी, फडणवीस यांच्या नेतृत्त्वात घेतले 4 महत्वाचे निर्णय
Recommended image2
Ladki Bahin Yojana : ऑगस्टचा हप्ता कधी खात्यात येणार?, संभाव्य तारीख आणि महत्वाची माहिती समोर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved