अमित शाह यांनी नांदेडमध्ये उद्धव ठाकरे गटावर टीका केली आणि 'ऑपरेशन सिंदूर'चे कौतुक केले. शाह म्हणाले की बाळासाहेब ठाकरे हयात असते तर पंतप्रधान मोदींना मिठी मारली असती.
पुण्यात यंदा मे महिन्यातच मान्सूनने एन्ट्री मारली आहे, ज्यामुळे ६४ वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. गेल्या अकरा दिवसांत शहरात विक्रमी पावसाची नोंद झाली असून, पुणेकरांना सुखद गारवा मिळाला आहे.
कल्याण-डोंबिवलीत करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. कल्याणमध्ये एका महिलेचा करोनामुळे मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथे पतीच्या विवाहबाह्य संबंध आणि सततच्या त्रासाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तुळजापूर ते औसा मार्गावर लातूर जिल्ह्यातील बेलकुंड उड्डाणपुलाजवळ हा अपघात घडला. त्यांच्या वाहनाचा वेग अधिक असल्याने कार थेट सुरक्षा कठडा तोडून खाली कोसळली आणि चार वेळा पलटी झाली.
मुंबईत मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून, शहरात पावसाचा कहर पाहायला मिळतोय. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून, मुंबई, ठाणे आणि रायगड धोक्याच्या झोनमध्ये आहेत. १९५० नंतर हा सर्वात लवकर आलेला मान्सून आहे.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात अतिवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्याने विनय घोरपडे या तरुणाने आपली बाईक खांद्यावर उचलून शेतातून नेली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, विनयच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार प्रवेश केला असून, मुंबई, पुणेसह अनेक भागात पाऊस पडत आहे. पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Baramati Rain Updates : पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला गेला आहे. अशातच बारामती, दौंड, इंदापूर, माळशिरस, कान्हेरी, पंढरपूर या भागांत मुसळधार पावसामुळे अक्षरशः दाणादाण उडालीये.
नवी मुंबईत धावत्या बसमध्ये कपलने अश्लील कृत्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. याच व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी कपलला अटक करत कोर्टात हजर केले. यानंतर कोर्टाने कपलला शिक्षा सुनावली आहे.
Maharashtra