सह्याद्रीतील महाबळेश्वर हे हिल स्टेशन पावसाळ्यात हिरवाईने नटलेले असते. धबधबे, ओढे आणि दाट धुक्याचा अनुभव घेण्यासाठी महाबळेश्वरला भेट द्या.
महाराष्ट्रात पावसाळा सुरू झाला असून, IMD ने कोकण, घाट आणि मध्य महाराष्ट्रासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. पुढील तीन ते पाच दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपमधील आयारामांवर टिप्पणी करत राजकीय प्रवेशांवर भूमिका मांडली. बडगुजर यांच्या प्रवेशावर नाराजी व्यक्त करत त्यांनी मोदी सरकारच्या कामगिरीचा दाखला दिला.
बीड जिल्ह्यातील केज-अंबाजोगाई रोडवर कारने पायी जाणाऱ्या युवकाला धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. कार खड्ड्यात कोसळून दोन प्रवासी जखमी झाले. खराब रस्त्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, जायकोचीवाडी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले
Akola Doctor Javarkar Suicide: अकोल्यातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Navi Mumbai Accident: खारघरमध्ये शनिवारी सायंकाळी एका १९ वर्षीय तरुणीने तिच्या मर्सिडीज कारने स्कुटीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला धडक दिली. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे.
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दावा केला आहे की गुवाहाटी बंडाच्या वेळी संजय राऊत शिंदे गटात सामील होऊ इच्छित होते, परंतु 30-35 आमदारांनी त्यांना आक्षेप घेतल्याने त्यांचा प्रवेश नाकारला गेला.
आळंदीतील कत्तलखान्याचे आरक्षण रद्द केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात एका नागरिकाला ५०,००० रुपयांची खंडणीची धमकी देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपहरण प्रकरणानंतर पुन्हा असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पुणे - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील टर्मिनलवर योग सत्र आयोजित केले होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या सत्राचे उद्घाटन केले. वेगवेगळी योगासने करीत योग दिन उत्साहात साजरा केला.
Maharashtra